अक्किनेनी कुटुंबात पाळणा हलणार? शोभिताच्या प्रेग्नन्सीवर सासरे नागार्जुनचं थेट उत्तर; म्हणाले 'मी स्वतः तुम्हाला...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sobhita Dhulipala Pregnancy: शोभिता प्रेग्नंट आहे का? या एका प्रश्नाने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली असून, खुद्द सासरेबुवा म्हणजेच सुपरस्टार नागार्जुन यांनी यावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/7

मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पॉवर कपल नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला सध्या त्यांच्या लग्नानंतरच्या आयुष्याचा आनंद लुटत आहेत. ४ डिसेंबर २०२४ रोजी या जोडीने अत्यंत शाही थाटात लग्नगाठ बांधली.
advertisement
2/7
मात्र, लग्नाला अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच, आता अक्किनेनी कुटुंबात नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शोभिता प्रेग्नंट आहे का? या एका प्रश्नाने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली असून, खुद्द सासरेबुवा म्हणजेच सुपरस्टार नागार्जुन यांनी यावर मौन सोडलं आहे.
advertisement
3/7
नुकतंच एका कार्यक्रमात नागार्जुन यांनी हजेरी लावली होती. तिथे पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि थेट प्रश्न विचारला, "तुम्ही लवकरच आजोबा होणार आहात का? शोभिता खरंच गुड न्यूज देणार आहे का?" हा प्रश्न ऐकताच नागार्जुन आधी थोडे अवघडले, पण लगेच त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं.
advertisement
4/7
त्यांनी या बातमीचा स्पष्ट नकार दिला नाही की होकारही दिला नाही. हसत हसत पुढे जाताना ते फक्त इतकंच म्हणाले, "योग्य वेळ आल्यावर मी स्वतः तुम्हाला सगळं सांगेन!" नागार्जुन यांच्या या एका वाक्याने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नेटकऱ्यांनी आतापासूनच नागा चैतन्य आणि शोभितावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे.
advertisement
5/7
चाहते शोभिताच्या प्रत्येक फोटोचं आणि व्हिडिओचं बारकाईने निरीक्षण करत आहेत. २०२२ पासून नागा चैतन्य आणि शोभिताच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. हैदराबादमधील चैतन्यच्या घरी शोभिता दिसल्यापासून ते लंडनच्या सुट्ट्यांपर्यंत, प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली होती.
advertisement
6/7
आता नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांनी ही गोड बातमी समोर येत असल्याने अक्किनेनी खानदानात आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे, नागा चैतन्यची माजी पत्नी सामंथा रुथ प्रभू हिनेदेखील तिच्या आयुष्याची नवी सुरुवात केली असून ती तिच्या कामात व्यग्र आहे.
advertisement
7/7
आता नागार्जुन यांनी दिलेल्या या सस्पेन्स उत्तरामुळे चाहत्यांना फक्त त्या योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत या केवळ चर्चा असल्या तरी, नागार्जुन यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातो, असं प्रेक्षकांचं मत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अक्किनेनी कुटुंबात पाळणा हलणार? शोभिताच्या प्रेग्नन्सीवर सासरे नागार्जुनचं थेट उत्तर; म्हणाले 'मी स्वतः तुम्हाला...'