बीचवर मज्जा करण्यासाठी गेलेल्या पुण्याच्या Thar चालकाने एकाला चिरडले, जागेवर गेला जीव
- Published by:Prachi Amale
Last Updated:
या अपघातात परवेज हमदुले याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
1/7

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहरात मंगळवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. पुण्यावरून श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या थार (चारचाकी) वाहनाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.
advertisement
2/7
या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. परवेज हमदुले असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना श्रीवर्धन बाजारपेठेतील राऊत हायस्कूल परिसरात घडली.
advertisement
3/7
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या थार वाहनाने अचानक नियंत्रण गमावल्याने रस्त्याच्या कडेला चाललेल्य दोन मोटारसायकलींना धडक दिली.
advertisement
4/7
या अपघातात परवेज हमदुले याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर थार वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.
advertisement
5/7
घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परवेज हमदुले यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
advertisement
6/7
या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पर्यटकांच्या निष्काळजी वाहनचालना विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
advertisement
7/7
श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची संख्या वाढत असताना वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि भरधाव वाहनांमुळे स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
बीचवर मज्जा करण्यासाठी गेलेल्या पुण्याच्या Thar चालकाने एकाला चिरडले, जागेवर गेला जीव