मक्याचे सर्वाधिक दर आजही स्थिर
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.00 वाजताच्या रिपोर्टनुसार, 17 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 38 हजार 730 क्विंटल इतकी झाली. आज मक्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. नाशिक मार्केटमध्ये झालेल्या 7 हजार 835 क्विंटल हायब्रीड मक्यास प्रतीनुसार 1370 ते 1825 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मुंबई मार्केटमध्ये आज मक्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 230 क्विंटल मक्यास किमान 2500 तर कमाल 3800 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मंगळवारी मक्याला मिळालेला सर्वाधिक बाजारभाव आजही स्थिर आहे.
advertisement
कांद्याची आवक किती झाली?
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 लाख 86 हजार 481 क्विंटल इतकी झाली. त्यातील 44 हजार 094 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. नाशिक बाजारात कांद्याला 461 ते 2778 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तसेच कोल्हापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 4728 क्विंटल कांद्यास 4000 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारी मिळालेला कांद्याचा सर्वाधिक भाव आजही स्थिर आहे. तर इतर बाजारांमध्ये मात्र दरात चढ-उतार झाल्याचे चित्र आहे.
सोयाबीनच्या सर्वाधिक दरात काहीशी वाढ
राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 44 हजार 256 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक ही लातूर मार्केटमध्ये झाली. लातूर मार्केटमधील 18 हजार 537 क्विंटल सोयाबीनला 3908 ते 4653 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 1688 क्विंटल सोयाबीनला 5750 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.





