Nana Patekar : नाना पाटेकरांचं खतरनाक ट्रेनिंग पाहून रडला अभिनेता, कपड्यांमध्येच केली लघवी!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Nana Patekar: नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेते आहेत. त्यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. नाना पाटेकांचा शिस्तबद्धपणा पाहून एक अभिनेता अक्षरशः रडायला लागला. कपड्यामध्येक लघवी केली.
advertisement
1/7

नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेते आहेत. त्यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. नाना पाटेकांचा शिस्तबद्धपणा पाहून एक अभिनेता अक्षरशः रडायला लागला. कपड्यामध्येक लघवी केली.
advertisement
2/7
नाना पाटेकर दिग्दर्शित 'प्रहार सिनेमा आठवला तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. दिग्दर्शक म्हणून नानांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि त्यांनी यात कोणतीही व्यावसायिक तडजोड न करता वास्तवतेला महत्त्व दिलं. माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडिया यांनी तर चित्रपटात मेकअपही केला नव्हता.
advertisement
3/7
'प्रहार'मध्ये नानांनी साकारलेला मेजर चौहान केवळ एक कडक अधिकारी नव्हता, तर तो व्यवस्थेतील सडकेपणावर थेट बोट ठेवणारा एक आवाज होता. न्यायालयात उभं राहून तो न्यायधीशांना विचारतो, "देश म्हणजे काय? रस्ते, इमारती, शेती... आणि लोक कुठे आहेत? सीमेवर शत्रू दिसतो, पण इथे तर चोहीकडे शत्रू आहेत, फक्त तो या किंवा त्या बाजूचा असतो." त्याचे हे शब्द आजही समाजाला विचार करायला लावतात.
advertisement
4/7
नाना पाटेकर यांना खरंतर सैन्यात भरती व्हायचं होतं, पण ते शक्य न झाल्याने त्यांनी 'प्रहार'च्या माध्यमातून आपली तळमळ व्यक्त केली. भूमिकेसाठी त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीसोबत तीन वर्षं कठोर प्रशिक्षण घेतलं, इतकंच नव्हे तर कारगिल युद्धातही ते लष्कराच्या जलद प्रतिसाद पथकाचा भाग होते.
advertisement
5/7
'प्रहार'मधील त्यांचे सहकारी शिव सुब्रमण्यम तर म्हणाले होते की नाना सैन्यात भरती होण्यासही पात्र होते. सेटवरही नाना एका कडक कमांडोसारखेच वागत होते. नानांनी द लल्लंटॉपच्या 'गेस्ट इन द न्यूजरूम' या शोमध्ये शिव सुब्रमण्यमशी संबंधित एक घटना सांगितली होती. या चित्रपटात शिवने एका सैनिकाची भूमिका केली होती ज्याला मेजर चौहान प्रशिक्षण देत होते.
advertisement
6/7
एका दृश्यात, शिवला जमिनीपासून 60 फूट उंचीवर बांधलेल्या दोरीवर चालावे लागले. शिवला उंचीची खूप भीती वाटत होती. त्याचे पाय नंतर थरथरायला लागले. नाना म्हणतात की शिव खूप रडू लागला, त्याने त्याच्या कपड्यांमध्ये लघवी केली. पुढच्या शॉटमध्ये, मेजर चौहान वर चढतात आणि शिवचे पात्र चालताना दाखवतात.
advertisement
7/7
'प्रहार' मध्ये माधुरीने पीटरची पत्नी शर्लीची भूमिका साकारली होती. इथे माधुरीला मर्यादित स्क्रीन स्पेस मिळाली असेल पण तिने उत्तम काम केले. माधुरीने नानांना पाठिंबा देण्यासाठी हा चित्रपट केला. माधुरीने तिच्या एका दृश्यावर म्हटले होते,'चित्रपटात फक्त एकच अभिनयाचा सीन होता पण तो एक असा क्षण होता ज्याचा मला खूप अभिमान आहे. तो खूप शांत आणि हृदयस्पर्शी क्षण होता पण दिग्दर्शकाने कट सांगेपर्यंत मी थरथर कापत होतो.'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nana Patekar : नाना पाटेकरांचं खतरनाक ट्रेनिंग पाहून रडला अभिनेता, कपड्यांमध्येच केली लघवी!