'तुझं तोंड दाखवू नको', अभिनेत्याचे सिनेमे पाहून भडकले वडील, घरी येण्यासाठी केली मनाई, एका हिटने केला चमत्कार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Celebrity Struggle : कित्येकजण सिनेसृष्टीत करण्यासाठी येतात. काहींची ही स्वप्न उशीरा का होईना पूर्ण होतात, मात्र काहींच्या पदरी निराशा पडते.
advertisement
1/9

मोठ्या पडद्यावर येण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण हे स्वप्न सत्यात उतरणार की नाही, किंवा कधी उतरणार याबाबत कोणतीही खात्री नसते. असे असतानाही कित्येकजण सिनेसृष्टीत त्यांचे करिअर बनवण्यासाठी येतात. काहींची ही स्वप्न उशीरा का होईना पूर्ण होतात, मात्र काहींच्या पदरी निराशा पडते.
advertisement
2/9
असंच काहीसं नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत घडलं. बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केलेले अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यशामागे मोठा संघर्ष आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातून आणि वडिलांकडूनही उपहासात्मक वागणूक मिळाली होती.
advertisement
3/9
एका पॉडकास्टमध्ये नवाजुद्दीन यांनी त्यांच्या वडिलांशी संबंधित एक भावूक आणि धक्कादायक किस्सा शेअर केला आहे, जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना घरी येण्यास मनाई केली होती आणि यामुळे तब्बल तीन वर्षे नवाजुद्दीन यांना त्यांच्या गावी जाता आले नव्हते.
advertisement
4/9
यू-ट्यूबर राज शमनी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांच्या अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांतील अनुभव सांगितला. "सुरुवातीला मला चित्रपटांमध्ये नेहमी मार खाताना दाखवले जायचे. 'सरफरोश'मध्ये मला मारले, 'मुन्ना भाई एम.बी.बी.एस'मध्येही तेच झाले. मी नेहमी मार खाणारा एक चोर आणि पॉकेटमार असायचो."
advertisement
5/9
नवाजुद्दीन म्हणाले की, आम्ही पश्चिम उत्तर प्रदेशातील आहोत, जिथे लोकांना खूप अभिमान असतो. "माझ्या गावातील लोक माझ्या वडिलांना सांगायचे, 'तुमचा मुलगा चित्रपटांमध्ये नेहमी मार खात असतो'." यामुळे माझे वडील खूप अस्वस्थ झाले होते. नवाजुद्दीन यांनी वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकले नाहीत.
advertisement
6/9
"मी वडिलांना सांगितले की, मला दुसरे काही काम मिळत नाहीये, मी प्रयत्न करत आहे. तेव्हा ते चिडून म्हणाले, 'मग मार खाल्ल्यानंतर तू गावी येणे बंद कर!'" वडिलांचे हे बोलणे ऐकून नवाजुद्दीन इतके दुःखी झाले की, त्यांनी तब्बल तीन वर्षे आपल्या गावी जाणे टाळले.
advertisement
7/9
नवाजुद्दीनला खरी ओळख २०१२ मध्ये आलेल्या अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्यांनी साकारलेल्या भूमिकेची आणि त्यांच्या डायलॉग्सची प्रचंड प्रशंसा झाली. हा चित्रपट एक कल्ट क्लासिक ठरला.
advertisement
8/9
'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर ते जेव्हा गावी गेले आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारले, "आता तुमचे काय मत आहे?" तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिले, "होय, या वेळेस तू चांगले काम केले आहे."
advertisement
9/9
दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी नुकतंच थामा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले असून लवकरच आंतरराष्ट्रीय कलाकार इलिया वोलोकसोबत डकैती-थ्रिलर 'फरार' आणि 'सेक्शन १०८' यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुझं तोंड दाखवू नको', अभिनेत्याचे सिनेमे पाहून भडकले वडील, घरी येण्यासाठी केली मनाई, एका हिटने केला चमत्कार