कोट्यवधींची मालकिण आहे माधुरी दीक्षित, पण डॉ. नेनेंचा महिन्याचा पगार किती? आकडा पाहून विश्वास बसणार नाही
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Madhuri Dixit-Dr. Shriram Nene Networth : माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि अमेरिकेत स्थायिक झाली. त्यांची एकत्रित संपत्ती पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
advertisement
1/7

हिंदी सिनेसृष्टीतील एक अनोखा चेहरा, प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. तिच्या जबरदस्त नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने संपूर्ण देशाला घायाळ केलं. मात्र, १९९९ मध्ये जेव्हा तिने अमेरिकास्थित हृदयशल्यतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं, तेव्हा अनेक चाहत्यांची मनं मोडली.
advertisement
2/7
लग्नानंतर माधुरीने बॉलिवूडमधून काही काळासाठी विश्रांती घेतली आणि नवऱ्याबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली. तिथं तिने पत्नी, आई आणि एक सामान्य गृहिणी म्हणून नवं आयुष्य सुरू केलं. पण ही चमकदार अभिनेत्री आपल्या करिअरपासून फार काळ दूर राहू शकली नाही. हळूहळू तिने पुन्हा रुपेरी पडद्यावर परत येण्यास सुरुवात केली.
advertisement
3/7
दुसरीकडे, डॉ. श्रीराम नेने हे केवळ हृदयशल्यतज्ज्ञ नव्हते, तर एक दूरदृष्टी असलेले उद्योजकही होते. अमेरिकेत यशस्वी सर्जन म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी भारतात डिजिटल हेल्थकेअर क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यांनी Pathfinder Health Sciences ही कंपनी सुरू केली. इतकंच नाही, तर ते आयआयटी जोधपूरच्या सल्लागार मंडळावरही आहेत.
advertisement
4/7
या जोडप्याने "Dance With Madhuri" आणि "RnM Moving Pictures" सारखे उपक्रम सुरू करून कलाक्षेत्र आणि डिजिटल माध्यमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
advertisement
5/7
माधुरीने ७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचं सौंदर्य, अभिनय आणि नृत्यकौशल्य आजही लोकांना भुरळ घालतात. याशिवाय ती विविध रिअ‍ॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून झळकली आहे, अनेक ब्रँड्सची अँबेसॅडर राहिली आहे आणि तिचा स्वतःचा प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. तिच्या करिअरचं परिमाण केवळ पडद्यावरच नाही तर आर्थिकदृष्ट्याही प्रभावी आहे.
advertisement
6/7
माधुरी दीक्षित यांची एकूण अंदाजे संपत्ती आहे २५० कोटी रुपये, तर डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती १०० ते १५० कोटी रुपये दरम्यान आहे. या दोघांची एकत्रित नेट वर्थ म्हणजेच एकूण संपत्ती ३५० ते ४०० कोटी रुपये आहे.
advertisement
7/7
दरम्यान, काही मिडिया रिपोर्ट्समध्ये डॉक्टर श्रीराम नेने यांचे वार्षिक उत्पन्न ९८ लाख इतके असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच त्यांचे दरमहा उत्पन्न ७ लाखांहून जास्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोट्यवधींची मालकिण आहे माधुरी दीक्षित, पण डॉ. नेनेंचा महिन्याचा पगार किती? आकडा पाहून विश्वास बसणार नाही