TRENDING:

नशेत घरी आलेल्या महेश भट्टला बायकोने घडवलेली अद्दल, वडिलांचा 'तो' भयानक आवाज आठवून आजही दचकते पूजा

Last Updated:
Pooja Bhatt-Mahesh Bhatt : पूजा भट्टने आपल्या 'द पूजा भट्ट शो' या पॉडकास्टमध्ये तिने महेश भट्टांची मुलाखत घेतली, ज्यात तिने एक जुनी, अत्यंत नाट्यमय आणि अविस्मरणीय आठवण सांगितली.
advertisement
1/9
'त्याला तिथेच राहूदेत', नशेत घरी आलेल्या महेश भट्टला बायकोने घडवलेली अद्दल
मुंबई: अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट नेहमीच आपल्या आयुष्यातील खासगी गोष्टी अत्यंत स्पष्टपणे आणि न घाबरता सर्वांसमोर मांडते. तिचे वडील महेश भट्ट आणि त्यांच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या भावनिक क्षणांबद्दल तिने अनेकदा खुलेपणाने भाष्य केले आहे.
advertisement
2/9
नुकतंच, आपल्या 'द पूजा भट्ट शो' या पॉडकास्टमध्ये तिने महेश भट्टांची मुलाखत घेतली, ज्यात तिने एक जुनी, अत्यंत नाट्यमय आणि अविस्मरणीय आठवण सांगितली.
advertisement
3/9
पूजा भट्टने वडिलांना त्या एका क्षणाची आठवण करून दिली, जेव्हा तिच्या आईने म्हणजेच किरण भट्टने दारू पिऊन आलेल्या महेश भट्टांना थेट घराच्या बाल्कनीत कोंडून ठेवले होते.
advertisement
4/9
पूजा त्या घटनेचे वर्णन करताना म्हणाली, "जेव्हा आम्ही 'सिल्व्हरसँड्स' मध्ये राहत होतो, तेव्हा एक रात्र तुम्ही खूप दारू पिऊन घरी आलात आणि बाल्कनीत गेलात. आईसाठी तो नक्कीच एक वाईट अनुभव असेल, म्हणून तिने उठून तुम्हाला तिथे बंद केले."
advertisement
5/9
पुढे ती म्हणाली, "बाहेर समुद्राच्या लाटा उसळत होत्या आणि तुम्ही बाल्कनीतून 'किरण, पूजा, मला आत येऊ द्या!' असे ओरडत होता. तुमचा तो आवाज समुद्राच्या लाटांच्या आवाजासोबत घुमत होता आणि तो क्षण माझ्या आजही लक्षात आहे."
advertisement
6/9
पूजाला वडिलांचा तो आवाज ऐकून लगेच उठून दरवाजा उघडावासा वाटला होता. पण तिच्या आईने तिला थांबवले. आई म्हणाली की, महेश भट्ट रोज दारू पिऊन येतात, हे योग्य नाही. त्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे.
advertisement
7/9
पूजा आठवण करून देते, "मी आईला विचारले की, 'ते खाली पडले तर काय?' त्यावर आई म्हणाली, 'तू नेहमीच तुझ्या वडिलांची बाजू घेतेस.'"
advertisement
8/9
पूजा पुढे म्हणाली की, ती नेहमीच वडिलांच्या बाजूने उभी राहिली, पण एकदा त्यांचा मोठा वाद झाला आणि ती घर सोडून निघून गेली. "मी खूप दुखावली होती, तेव्हा तुम्ही मला फोन केलात आणि ओरडून म्हणालात, 'ती नेहमीच तुझी पहिली पसंती राहील!' हे ऐकून माझे मन तुटले होते. मी माझ्या सहा प्लास्टिकच्या पिशव्या आणि त्यात असलेले माझे सर्व कपडे घेऊन घरी परत आले."
advertisement
9/9
पूजा भट्टांनी सांगितले की, "त्यावेळी मी पहिल्यांदा तुम्हाला एक माणूस म्हणून पाहिले." हे सर्व अनुभव सांगताना बापलेकीच्या नात्यातील गुंतागुंत आणि प्रेम पुन्हा एकदा समोर आले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नशेत घरी आलेल्या महेश भट्टला बायकोने घडवलेली अद्दल, वडिलांचा 'तो' भयानक आवाज आठवून आजही दचकते पूजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल