TRENDING:

प्राजक्ता माळीचं 11 व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन संपन्न! जीवलग मैत्रिणीसोबत पूर्ण केली केदारनाथची यात्रा, कोण आहे ती?

Last Updated:
प्राजक्ता माळीने केदारनाथ यात्रा पूर्ण केली असून तिच्या पोस्टवर चाहत्यांनी 'हर हर महादेव' म्हणत कमेंट्स केल्या आहेत. अमृता खानविलकरही तिच्यासोबत होती. दोघींच्या मैत्रीची खोली दिसून आली.
advertisement
1/7
जीवलग मैत्रिणीसोबत प्राजक्ता माळीने पूर्ण केली केदारनाथची यात्रा, पाहा PHOTO
उत्तराखंडमध्ये असलेलं केदारनाथ धाम हे भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक मोठ्या संख्येने या पवित्र यात्रेला जातात. मराठी कलाविश्वातील आपली लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच ही केदारनाथ यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
advertisement
2/7
केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिच्या भक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. प्राजक्ता माळी गेल्या काही महिन्यांपासून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण करत आहे.
advertisement
3/7
केदारनाथ मंदिर हे बर्फवृष्टीमुळे दिवाळीनंतर सहा महिने बंद असतं. त्यामुळे मंदिराचे दरवाजे उघडल्यावर लगेच केदारनाथला जाणार असल्याचं प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना आधीच सांगितलं होतं. तिने फोटो शेअर करत लिहिलं आहे, "श्री केदारनाथ... रुद्रप्रयाग- उत्तराखंड. अशाप्रकारे १२ ज्योतिर्लिंग यात्रेतील ११ व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडलं."
advertisement
4/7
प्राजक्ताच्या या पोस्टवर 'हर हर महादेव' म्हणत चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या या आध्यात्मिक प्रवासाचं आणि तिच्या निष्ठेचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, प्राजक्तासोबत या केदारनाथ यात्रेत मराठी कलाविश्वातील दुसरी एक लोकप्रिय अभिनेत्री, अमृता खानविलकर देखील सहभागी झाली होती.
advertisement
5/7
ही बातमी ऐकून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "यावेळी कुटुंबासमवेत अमृता देखील यात्रेत सहभागी झाली, याचा अत्यानंद आहे." यामुळे या दोघींच्या मैत्रीची खोलीही दिसून येते.
advertisement
6/7
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघींचाही उत्साह आणि श्रद्धायुक्त भाव स्पष्टपणे दिसतो. याशिवाय, अमृता खानविलकरने देखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केदारनाथ यात्रेदरम्यानचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
advertisement
7/7
बर्फाच्छादित डोंगर आणि पवित्र मंदिराच्या पार्श्वभूमीवर या दोघींचे फोटो खरोखरच मनमोहक आहेत. या दोघी मैत्रिणींनी एकत्र केलेली ही पवित्र यात्रा त्यांच्या आयुष्यात एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेली असेल, हे निश्चित.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्राजक्ता माळीचं 11 व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन संपन्न! जीवलग मैत्रिणीसोबत पूर्ण केली केदारनाथची यात्रा, कोण आहे ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल