Prajakta Mali: 'एवढं गोड नसतं दिसायचं', प्राजक्ता माळीचा हटके अंदाज, किलर पोझ पाहून चाहते फिदा!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prajakta Mali: प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि नियमितपणे तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
advertisement
1/7

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि नियमितपणे तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच तिने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो शेअर केले आहेत.
advertisement
2/7
तिच्या फोटोंना चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देतात. तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलचे अनेकजण कौतुक करतात. अशातच प्राजक्ताच्या नव्या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
3/7
प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर हे लेटेस्ट फोटोशूट केलं आहे. प्राजक्ताचा हटके लूक आणि कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहे. कमेंटचा पाऊस प्राजक्ताच्या पोस्टवर पहायला मिळतोय.
advertisement
4/7
प्राजक्ताने 'प्राची द लेबल' या डिझायनरने तयार केलेला सुंदर मोरपंखी रंगाचा इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान केलाय. या ड्रेसवर लाल रंगाची ओढणी घेतलेली होती, ज्यामुळे ड्रेस अधिक आकर्षक दिसत होता.
advertisement
5/7
मोठ्या आकाराचे झुमके तिच्या लुकला पारंपरिक आणि मॉडर्न टच देताना दिसत आहेत. चाहते म्हणाले, लूक ब्युटिफूल आणि युनिक, अप्रतिम सुंदर, सावर रे मना, नको बघू इतक्या प्रेमाने तिला, तुमची गोड smile म्हणजे जणू गुलकंदच, एवढं गोड नसत दिसायचं, अशा अनेक कमेंट येत आहेत.
advertisement
6/7
प्राजक्ता अनेकदा वेगवेगळ्या वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूकमध्ये फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला विविध स्टाईल्स पाहायला मिळतील.
advertisement
7/7
दरम्यान, प्राजक्ताची मोठी फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिची कुठलीही पोस्ट असो ती लगेच व्हायरल होते आणि कमेंट लाइक्सचा पाऊस पडतो. त्यामुळे प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali: 'एवढं गोड नसतं दिसायचं', प्राजक्ता माळीचा हटके अंदाज, किलर पोझ पाहून चाहते फिदा!