Prarthana Behere : 'मला कायमच मूल नको...' प्रार्थना बेहेरेनं स्पष्टचं सांगितलं आई न होण्यामागचं कारण
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली. प्रार्थनाने आता वयाची चाळीशी पार केलीय. तिने 2017 मध्ये अभिषेक जावकरशी लग्नगाठ बांधली. पण लग्नाला इतकी वर्ष उलटूनही प्रार्थना अजून आई का नाही झाली असा प्रश्न चाहत्यांना पडतो. आता अखेर तिने या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना देऊन टाकलं आहे.
advertisement
1/8

प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली.
advertisement
2/8
प्रार्थनाने 2017 साली अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली.अनेक जण प्रार्थनाला तू आई कधी होणार असा प्रश्न विचारत असतात. आता सुलेखा तळवलकर च्या 'दिल के करीब' या मुलाखतीत अभिनेत्रीनं याचं उत्तर दिलं आहे.
advertisement
3/8
प्रार्थना सध्या सासू सासऱ्यांसोबत मुंबई सोडून अलिबागला राहते.
advertisement
4/8
याविषयी बोलताना तिने 'तिथे मी मेकअपशिवाय फिरू शकते, झाडांची काळजी घेते. माझी पेंटिग्जची आवड जपते. प्रवासाच्या दृष्टीने थोडासा त्रास झाला पण पण आता सवय झालीये. आता काहीच वाटत नाही. आम्हाला आता एक वर्ष पूर्ण होईल.' असं मत व्यक्त केलं आहे.
advertisement
5/8
तसंच यावेळी प्रार्थनाने आई होण्याच्या निर्णयावर देखील भाष्य केलं. तिने कधीच मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतल्याचं ती म्हणाली.
advertisement
6/8
यामागे कारण सांगताना प्रार्थना म्हणाली, 'मला कायमच मूल नको होतं. त्याऐवजी मला खूप पेट्स हवे होते. जेव्हा माझं अभीशी लग्न ठरलं तेव्हा मी त्याला हेच सांगितलं, त्यानंही ते मान्य केलं. त्यानंतर आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला.'
advertisement
7/8
प्रार्थना पुढे म्हणाली, 'आता आम्ही आमच्या या मुलांची काळजी घेतोय. पण सगळ्यात महत्वाचं आमच्या कुटूंबाचा याला पूर्ण पाठींबा होता. त्यांनीही आमचं म्हणणं मान्य केलं' असा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे.
advertisement
8/8
यापूर्वी प्रार्थना याच विषयी एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'मला खूप बाळं आहेत. आमच्याकडे पाच पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि मासे आहेत, दोन उंदीर आहेत, अशी खूप मुलं आहेत.'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prarthana Behere : 'मला कायमच मूल नको...' प्रार्थना बेहेरेनं स्पष्टचं सांगितलं आई न होण्यामागचं कारण