TRENDING:

रिलीज डेटवरून राडे! 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'च्या प्रदर्शनाची तारिख परत बदलली, आता या दिवशी येणार थिएटरमध्ये

Last Updated:
Punha Ekda Sade Made Teen New Release Date : पुन्हा एकदा साडे माडे तीन या सिनेमाची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आली आहे. अंकुश चौधरीच्या बर्थडे निमित्तानं सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
1/8
'पुन्हा एकदा साडे माडे तीन'ची रिलीज डेट परत बदलली, आता या दिवशी येणार थिएटरमध्ये
30 जानेवारीला रिलीज होणाऱ्या पुन्हा साडे माडे तीन या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाला रिलीज डेट मिळत नव्हती. निर्मात्यांनी इतर मराठी सिनेमांसाठी हा सिनेमा बाजूला ठेवला होता. अखेर 31 जानेवारी ही रिलीज डेट फायनल झाली. मात्र त्यावरूनही खूप राडे पाहायला मिळाले.
advertisement
2/8
'रणपति शिवराय स्वारी आग्रा' या सिनेमाची रिलीज डेटही 31 जानेवारी ठेवण्यात आली. त्यानंतर दोन्ही सिनेमांच्या निर्मात्यांमध्ये भांडणं आणि टीका झाली. अखेर पुन्हा साडे माडे तीन या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
advertisement
3/8
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसीय दुखवटा जाहिर करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा साडे माडे तीनच्या निर्मात्यांनी सिनेमा रिलीज पुढे ढकलला. अखेर सिनेमाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे.
advertisement
4/8
'पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा सिनेमा रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजांची आणि अनपेक्षित वळणांची धमाल सांगणार आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या कथेचा केंद्रबिंदू आहे.
advertisement
5/8
या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडाली, याची उत्तरं सिनेमा पाहूनच मिळणार आहेत.
advertisement
6/8
'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा बहुप्रतीक्षित सिनेमा आता 13 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्य भेटीला येणार आहे. दिग्दर्शक अंकुश चौधरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली. थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
advertisement
7/8
सिनेमाबाबत बोलताना निर्माते अमेय खोपकर म्हणाले, "माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. हा आघात अत्यंत वेदनादायी असून, या दुःखात आम्हीही सहभागी आहोत."
advertisement
8/8
या सिनेमात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रिलीज डेटवरून राडे! 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'च्या प्रदर्शनाची तारिख परत बदलली, आता या दिवशी येणार थिएटरमध्ये
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल