रणबीर -आलियाच्या बंगल्यावर 'सासू'ची नजर, रात्रंदिवस मारतेय फेऱ्या, कारण काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ranbir kapoor-alia bhatt new house : अभिनेत्री आलिया आणि रणबीर यांनी लेकीसाठी 250 कोटींचं घर बांधलं आहे. ज्यावर आलियाची सासू नीतू कपूर हिची नजर आहे.
advertisement
1/7

जेव्हा जेव्हा मुंबईतील आलिशान बंगल्यांची चर्चा होते तेव्हा शाहरुख खानचा मन्नत आणि अमिताभ बच्चन यांचा जलसा ही नावं लगेच डोळ्यांसमोर येतात. पण या कलाकारांच्या यादीत आलिया आणि रणबीर यांच्या घराचाही समावेश होणार आहे. आलिया, रणबीर आणि त्यांची मुलगी राहा कपूर या आलिशान घरात राहायला जाणार आहेत.
advertisement
2/7
रणबीर आणि आलियाचं लग्न झालं तेव्हापासून त्यांच्या नव्या घराचं काम सुरू आहे. तब्बल तीन वर्षांनी आलिया आणि रणबीरच्या घराचं काम पूर्ण झालं आहे. हे घर तब्बल 7-8 मजल्यांचं असेल. विशेष म्हणजे प्रत्येक मजल्याचं डिझाईन वेगळं असेल आणि प्रत्येक खोलीत एक खास थीम ठेवण्यात आली आहे.
advertisement
3/7
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे सध्या मुंबईत त्यांच्या नवीन आलिशान घराच्या कामात गुंतले आहेत. या घराची अंदाजे किंमत तब्बल 250 कोटी इतकी सांगितली जातेय. या घराचं काम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच हे दोघं त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत.
advertisement
4/7
रणबीर-आलियाने या नव्या घरात लेक राहासाठी एक खास खोली तयार केली आहे. ही खोली राहाच्या आवडी, सवयी आणि सुरक्षिततेला लक्षात घेऊन बांधली गेली आहे. खेळणी, रंगसंगती आणि हवेशीर रचना असलेली ही खोली आहे.
advertisement
5/7
दोघंही सध्या चित्रपटांच्या कामात व्यस्त असल्यामुळे नीतू कपूर या नवीन घराच्या कामाची नियमित पाहणी करतात. काहीही बिघाड होऊ नये आणि सर्व काही वेळेवर होईल याची तिथे त्या पूर्ण काळजी घेतात.
advertisement
6/7
सध्या रणबीर कपूर वेगळं राहत असला तरी हे नवीन घर संपूर्ण कुटुंब एकत्र आणण्यासाठी बांधलं जात आहे. वडील ऋषी कपूर यांच्या निधनानंतर रणबीरने आईची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आणि हे नवीन घर त्याचाच एक भाग आहे.
advertisement
7/7
रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या या नवीन घरासाठी अनेक वेळा कामाची पाहणी केली आहे. आता केवळ आतील सजावटीचं काम बाकी आहे. लवकरच हेही पूर्ण होईल आणि हे दोघं आपल्या लेकीसोबत नवीन आयुष्य सुरू करतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणबीर -आलियाच्या बंगल्यावर 'सासू'ची नजर, रात्रंदिवस मारतेय फेऱ्या, कारण काय?