TRENDING:

आतापर्यंत तीन मर्डर, प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्येच गेम! आंदेकर टोळीच्या 'सप्टेंबर बदला पॅटर्न'ची भानगड काय?

Last Updated:

Pune Andekar Gang: आंदेकर- कोमकर संघर्षात तीन वर्षात केले गेलेले सर्व हल्ले हे सप्टेंबर महिन्यातच झाल्याचं समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेत आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून केला. आरोपींनी 11 गोळ्या झाडल्या त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास समोर आला आहे.
Andekar Gang September Connection
Andekar Gang September Connection
advertisement

गेल्या पाच दशकात पुणे शहरात अनेक छोट्या-मोठ्या टोळ्या होत्या. जुगाराच्या अड्डे, दारूची अवैध विक्री आणि खंडणी ही मुख्य कमाई होती.यातच आंदेकर टोळी उदयास आली. या टोळीचे प्रमुख होता बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर. नाना पेठ, भवानी पेठ आणि गंज पेठ या भागात आंदेकर टोळीने दहशत निर्माण केली. गेल्या  50  वर्षात आंदेकर टोळीने अनेक टोळ्या नामशेष केल्या. मात्र आंदेकरांच्या पोटातून निर्माण झालेली कोमकर टोळी ही वरचढ ठरत आहे. आंदेकर- कोमकर संघर्षात तीन वर्षात केले गेलेले सर्व हल्ले हे सप्टेंबर महिन्यातच झाल्याचं समोर आले आहे.

advertisement

आयुषच्या हत्येची ठिणगी 2023 साली पडली

बंडू आंदेकरला पाच मुले आहेत. वनराज (मृत) , कृष्णकांत ही दोन मुले आणि संजिवनी, कल्याणी , वृंदावनी या तीन मुली... पाच भावंडामध्ये मालमत्तेवरून वाद सुरू झाले. या वादात वडिलांनी भावांची बाजू घेतली त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. त्यातून कोमकर टोळी उदयाला आली. आयुषच्या हत्येची ठिणगी ही दोन वर्षापूर्वी म्हणजे 2023 साली पडली होती.

advertisement

View More

सप्टेंबर 2023 मध्ये हल्ला

दोन वर्षपूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये कोमकरच्या गटातील निखिल अखाडेवर आंदेकर टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत बंडू आंदेकरला अटक केली. पण राजकीय पाठबळावर पोलिसांकडून दोषारोप पत्र दाखल होणार नाही याची तजवीज त्याने केली आणि त्याची सुटका झाली.

सप्टेंबर 2024 मध्ये वनराज आंदेकरची हत्या 

advertisement

निखिल आखाडेवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न कोमकर टोळीकडून प्रयत्न सुरू झाले. बदला घेण्यासाठी कोमकर टोळीला साथ सोमनाथ गायकवाड याची मिळाली. त्यासाठीचं कारण मिळालं संजीवनी कोमकरची मालकी असलेल्या दुकानावर वनराज आंदेकरने पुणे महापालिकेच्या मदतीने कारवाई केली यातून हा वाद समर्थ पोलिस ठाण्यात गेला. यातून समर्थ पोलिस ठाण्यासमोरच संजिवनीने सख्ख्या भावाला तुला मी ठोकेते अशा भाषेत धमकी दिली. या धमकीनंतर 1 सप्टेंबर 2024 साली हत्या केली. टोळी युद्धाचं हिंसक स्वरूप समोर आली.

advertisement

सप्टेंबर  2025 आयुष कोमकरची हत्या

वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले त्यादिवशीच गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला 4 सप्टेंबरला नाना पेठेत रक्तरंजीत घटना घडली. 19 वर्षीय आयुष गणेश कोमकर म्हणजे, वनराजचा भाचा क्लासवरुन परत येताच बेसमेंट पार्किंगमध्ये दोन बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी 11 गोळ्या झाडल्या. शरीरातून 9 गोळ्या बाहेर पडल्या, तो जागीच ठार झाला. या हत्येनेच वनराजच्या खूनाचा बदला पूर्ण झाला.

हे ही वाचा:

चुकीला माफी नाही... बंडू आंदेकरच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई

मराठी बातम्या/पुणे/
आतापर्यंत तीन मर्डर, प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्येच गेम! आंदेकर टोळीच्या 'सप्टेंबर बदला पॅटर्न'ची भानगड काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल