TRENDING:

Rashmika - Vijay Wedding : तारीख 26 वर्षपण 26, साऊथच्या रश्मिका-विजयने लग्नासाठी निवडलं बॉलिवूडचं फेव्हरेट डेस्टिनेशन

Last Updated:
Rashmika - Vijay Wedding Date And Location: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी हैदराबादमध्ये गुपचूप साखरपुडा केला. आता लग्नासाठी त्यांनी बॉलिवूड सेलेब्सचं फेव्हरेट डेस्टिनेशन निवडलं आहे.
advertisement
1/9
साऊथच्या रश्मिका-विजयने लग्नासाठी निवडलं बॉलिवूडचं फेव्हरेट डेस्टिनेशन
साऊथमध्ये सध्या एका सेलिब्रेटी कपलची चर्चा आहे हे म्हणजे रश्मिका आणि विजय देवरकोंडा. दोघांनी गुपचूप साखरपुडा केला. त्यानंतर लवकरच ते लग्न देखील करणार आहे. दोघांची लगीन घाई सुरू झाली आहे.
advertisement
2/9
दोघे कुठे आणि कधी लग्न करणार आहे याची माहिती समोर आली आहे. दोघांची लग्नाची तारीख ही 26 आहे आणि लग्नाचं वर्ष देखील 26 आहे. इतकंच नाही तर साऊथच्या रश्मिका आणि विजय यांनी लग्नासाठी बॉलिवूडचं फेव्हरेट डेस्टिनेशन निवडलं आहे.
advertisement
3/9
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गेल्या महिन्यात हैदराबादमधील गुपचूप साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याला जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. दोघांनी साखरपुडा इतका प्रायव्हेट ठेवला की साखरपुड्याचा एकही फोटो समोर आला नाही.
advertisement
4/9
पण दोघांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं तेव्हा दोघांच्याही हातात साखरपुड्याची अंगठी दिसली. त्यावरून दोघांचा साखरपुडा झाला आहे हे कन्फर्म झालं.
advertisement
5/9
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका आणि विजय यांचा लग्न समारंभ शाही थाटात आणि पारंपारिक विधींनी पार पडणार आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, त्यांचे भव्य लग्न 26 फेब्रुवारी 2026 रोजी आहे.  राजस्थानमधील उदयपूर येथील एका आलिशान राजवाड्यात हे लग्न होणार आहे.
advertisement
6/9
याच उदयपूरमध्ये बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचं लग्न झालं होतं. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं लग्नही उदयपूरच्या शाही राजवाड्यात झालं होतं. आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूर यांचंही लग्न इथेच झालं होतं.
advertisement
7/9
रश्मिका आणि विजय यांनी केरळ सारखं निसर्गरम्य ठिकाण सोडून त्यांनी उदयपूरला लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
advertisement
8/9
रश्मिका आणि विजय यांनी 2018 साली 'गीता गोविंदम' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या सिनेमाने दोघांना वेगळी ओळख निर्माण करून दिली.
advertisement
9/9
'गीता गोविंदम' सिनेमाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हणतात. त्यानंतर ते 'डियर कॉम्रेड' सिनेमात पुन्हा एकत्र दिसले. या सिनेमानंतर दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika - Vijay Wedding : तारीख 26 वर्षपण 26, साऊथच्या रश्मिका-विजयने लग्नासाठी निवडलं बॉलिवूडचं फेव्हरेट डेस्टिनेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल