TRENDING:

आलिशान बंगले, कोटींच्या गाड्या, 29व्या रश्मिकाचं लॅविश आयुष्य; एका फिल्मसाठी किती घेते मानधन?

Last Updated:
Rashmika Mandana Net Worth : 'पुष्पा 2' आणि 'छावा' सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे हिट झालेली रश्मिका मंदाना एका फिल्मसाठी किती पैसे घेते? तिच्याकडे महागड्या कारचं कलेक्शन देखील आहे.
advertisement
1/7
29 व्या वर्षी लॅविश आयुष्य जगते रश्मिका, एका फिल्मसाठी किती घेते फी?
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली रश्मिका मंदाना आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षांत तिने आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
advertisement
2/7
गेल्या वर्षी रश्मिकाच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडत सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटाचा किताब पटकावला होता. त्यानंतर तिचा 'छावा' हा चित्रपटही सुपरहिट ठरला. आपल्या 9 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये तिने साउथ आणि बॉलिवूडमध्ये एकूण 20 सिनेमांमध्ये काम केलं आहे.
advertisement
3/7
रश्मिका मंदान्नाने तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये ठसा उमटवला आहे. तिचा बंगळुरूमध्ये असलेला 8 कोटी रुपयांचा आलिशान बंगला लाकडी फर्निचरने समजवलेला आहे. हे घर शहराच्या गोंगाटापासून दूर, शांत वातावरणात आहे.
advertisement
4/7
याशिवाय कुर्ग, हैदराबाद आणि गोव्यातही तिच्या मालमत्ता आहेत. अलीकडेच तिने गोव्यात आणखी एक मोठा बंगला खरेदी केला असून ती तिथे अनेकदा पाहायला मिळते.
advertisement
5/7
रश्मिकाला महागड्या गाड्यांचा ही मोठा शौक आहे. तिच्याकडे Range Rover Sport आहे ज्याची भारतातील किंमत 1.84 कोटी रुपये आहे. Audi Q3 ही ही40 लाखांची कार रश्मिकाकडे आहे.
advertisement
6/7
50 लाखांची Mercedes-Benz C-Class जी ही कारही रश्मिकाकडे आहे. Toyota Innova आणि Hyundai Creta अशा एकापेक्षा एक आलिशान गाड्यांची रश्मिका मालकीण आहे.
advertisement
7/7
मिडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाची एकूण संपत्ती 66 कोटी रुपये आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 4-8 कोटी मानधन घेते. 'सिकंदर' या चित्रपटात तिने पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमासाठी तिने 5 कोटी मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आलिशान बंगले, कोटींच्या गाड्या, 29व्या रश्मिकाचं लॅविश आयुष्य; एका फिल्मसाठी किती घेते मानधन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल