Renuka Shahane : 'मी पुरुषांच्या घरात राहते...', असं का म्हणाली मराठमोळी रेणुका शहाणे?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Renuka Shahane : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा लग्नबंधनात अडकले असून त्यांना दोन मुलं आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने नुकतचं मी पुरुषांच्या घरात राहत असल्याचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/7

मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा काही वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले असून त्यांना दोन मुलं आहेत.
advertisement
2/7
रेणुका शहाणे आपला पती आणि मुलासोबत सुखात राहत आहेत. पण नुकतचं अमुक-तमुकला दिलेल्या मुलाखतीत मी पुरुषांच्या घरात राहत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
advertisement
3/7
रेणुका शहाणे म्हणाल्या,"मी बायकांच्या घरात वाढले आहे आणि आता मी पुरुषांच्या घरात राहते. कारण माझ्या घरात तीन पुरुष आहेत. 20 आणि 22 वर्षांची माझी दोन मुलं आहेत म्हणजे ते पुरुषच झाले. तर मला ही गोष्ट अंगवळणी पडायला थोडा वेळ लागला.
advertisement
4/7
बायकांमध्ये एक व्यवस्थितपणा असतो. बायकांच्या घरात सगळं व्यवस्थित केलं जातं. एकीने नाही केलं तर दुसरी करत असते. हा सगळा प्रकार खूप व्यवस्थित चालू असतो. आता असं झालंय हे सगळं फक्त मला बघायचं असतं, असं अभिनेत्रीने सांगितलं.
advertisement
5/7
पुरुषांमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचे काही अंश असतात का? असा प्रश्न मी एकदा आईला विचारला होता, असं रेणुका शहाणे म्हणाल्या.
advertisement
6/7
रेणुका शहाणे म्हणतात,"कारण लहानपणापासून कुठून येतो एवढा आत्मविश्वास या छोट्या पुरुषांना की हे तुझंच काम आहे? हे तिचंच काम आहे. हे काम आम्हाला करण्याची गरज नाही हे कुठून येतं. त्यामुळे त्या पद्धतीची जी शिस्त आहे ती मला खूप उशिरा कळली जेव्हा मी त्यांची मैत्रीण झाले. पण आता मी त्यांना ती शिस्त व्यवस्थित लावू शकते.
advertisement
7/7
रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या,"कारण मुलांना आता कळतंय की बाई म्हणजे काय? पुरुष म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी आता त्यांना व्यवस्थित कळत आहेत".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Renuka Shahane : 'मी पुरुषांच्या घरात राहते...', असं का म्हणाली मराठमोळी रेणुका शहाणे?