Rinku Rajguru : 'लग्न करेन तेव्हा स्वत: सांगेन...' कृष्णराज महाडिकसोबतचा तो फोटो, अखेर 6 महिन्यांनी रिंकू राजगुरूने मौन सोडलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru on Krshnaraj Mahadik Viral Photo : अभिनेत्री रिंकू राजगुरूनं कृष्णराज महाडिकसोबतच्या त्या फोटोवर अखेर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणाली रिंकू.
advertisement
1/10

सैराट फेम रिंकू राजगुरूचं नाव आजवर अनेकांबरोबर जोडलं गेलं आहे. त्यात एक फोटो समोर आला आणि थेट रिंकूच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या.
advertisement
2/10
भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक याच्याबरोबरचा रिंकूचा फोटो समोर आला आणि चर्चांना सुरूवात झाली.
advertisement
3/10
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात रिंकू आणि कृष्णराज यांनी एक फोटो काढला होता. जो कृष्णराज यांच्या टीमकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला.
advertisement
4/10
व्हायरल फोटोनंतर स्वत: कृष्णराजनं समोर येत फोटोवर स्पष्टीकरण दिलं होतं. पण रिंकूनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली होती.
advertisement
5/10
आता अनेक महिन्यांनी रिंकूनं या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. सकाळ प्रीमियरशी बोलताना रिंकू म्हणाली, "मी ते पोस्ट केलं नव्हतं. खरंतर मलाही नव्हतं माहिती, आपण रँडम कुठेही जातो तिथे लोक फोटो काढतात. तसा त्यांच्या टीमने टाकला."
advertisement
6/10
"आपल्या आयुष्यात हे रोजचं घडणारं आहे. माझ्यासाठी हे नवीन नाहीये. माझंही तेच झालं की याचा इतका बावू करायची गरजच नाहीये."
advertisement
7/10
रिंकू पुढे म्हणाली,"जेव्हा माझं लग्न जमेल तेव्हा मी स्वत: सांगेन सगळ्यांना की मी लग्न करतेय. याच्या आधीही अशा खूप न्यूज येऊन गेल्या त्यामुळे मी त्याचा इतका त्रास करून घेत नाही."
advertisement
8/10
रिंकूसोबतच्या फोटोवर कृष्णराज महाडिक यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, "माझी सगळ्यांना विनंती आहे की माझ्या फोटोचा चुकीचा अर्थ काढू नका. त्या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत."
advertisement
9/10
"आम्ही ठरवूनच भेटलो होतो. कोल्हापूरला एक कार्यक्रम होता. म्हणून त्या आल्या होत्या. त्यादरम्यान आमची भेट झाली."
advertisement
10/10
"आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे फोटो काढला आणि माझ्या ऑफिस टीमकडून तो पोस्ट केला गेला. त्यावरुन भरपूर अफवा पसरवल्या जात आहेत. पण, आमच्यात तसं काहीच नाही",
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'लग्न करेन तेव्हा स्वत: सांगेन...' कृष्णराज महाडिकसोबतचा तो फोटो, अखेर 6 महिन्यांनी रिंकू राजगुरूने मौन सोडलं