Rinku Rajguru : 'दुनियादारी मला जमत नाही..' रिंकूला नेमकं झालंय तरी काय? नव्या पोस्टने इंटरनेटवर खळबळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rinku Rajguru: रिंकू राजगुरू हे नाव ऐकलं की आपसूकच ‘सैराट’ चित्रपट आठवतो. सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु या सिनेमातून पदार्पण करताच रात्रीत स्टार बनली होती.
advertisement
1/7

रिंकू राजगुरू हे नाव ऐकलं की आपसूकच ‘सैराट’ चित्रपट आठवतो. सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु या सिनेमातून पदार्पण करताच रात्रीत स्टार बनली होती. तेव्हा पासून तिची प्रचंड क्रेझ असून आजतागायत ती तशीच आहे.
advertisement
2/7
आर्चीची भूमिका करून रिंकूने प्रेक्षकांची मने जिंकलीच मात्र तिने केवळ ‘सैराट गर्ल’ म्हणूनच नव्हे, तर आता विविध भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करत आहे. तिने अनेक वेगवेगळ्या सिनेमात हटके भूमिका साकारलेल्या पहायला मिळाल्या.
advertisement
3/7
रिंकूने मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झुंड’, ‘अठरा गड’, ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ यासारख्या चित्रपटांमधून तिने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
advertisement
4/7
रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते. त्यांच्याशी कनेक्टेड असते. रिंकूने नुकतंच लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत.
advertisement
5/7
रिंकूने साडीतील नवं फोटोशूट शेअर करताच चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळत आहे. साडीमध्ये हटके पोझ देत तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. त्यामुळे फोटोशूट शेअर होताच काहीच वेळाच इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले.
advertisement
6/7
रिंकूच्या फोटोंनी तर चाहत्यांना घायाळ केलंच पण तिच्या कॅप्शननेही सर्वांच्या भुवया उंचावल्या. फोटोसोबत तिचं कॅप्शनही चर्चेत आहेत. असं रिंकूने कॅप्शनला नेमकं का लिहिलं असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.
advertisement
7/7
रिंकू राजगुरुने साडीतील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'दुनियादारी मला जमत नाही आणि सादगी तुम्हाला जमत नाही'. रिंकूच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'दुनियादारी मला जमत नाही..' रिंकूला नेमकं झालंय तरी काय? नव्या पोस्टने इंटरनेटवर खळबळ