TRENDING:

'मन सुन्न झालंय', Ahmedabad Plane Crash नंतर रितेश देशमुख इमोशनल, POST

Last Updated:
Riteish Deshmukh Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अभिनेता रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली आहे. रितेश ट्विट शेअर केलं आहे.
advertisement
1/6
'मन सुन्न झालंय', Ahmedabad Plane Crash नंतर रितेश देशमुख इमोशनल, POST
अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघालं होतं. टेक ऑफ करताच हे विमान कोसळलं. या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.
advertisement
2/6
अहमदाबादच्या मेघानी परिसरात हे विमान कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली आणि धुराचे लोळ उसळले. स्थानिक अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं आहे.
advertisement
3/6
या विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने त्यांच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
advertisement
4/6
रितेश देशमुखने ट्विटमध्ये लिहिलंय, "अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेबद्दल ऐकून मन सुन्न झालं आहे. धक्का बसला आहे."
advertisement
5/6
"सर्व प्रवासी, त्यांचे कुटुंबीय आणि जमिनीवर जखमी झालेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अतिशय कठीण काळात मी सर्वांना माझ्या प्रार्थनांमध्ये सामावून घेत आहे."
advertisement
6/6
या अपघातात नेमकं काय घडलं याचा तपास सुरू आहे. एअर इंडियाचं हे विमान टेकऑफ करत असताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मन सुन्न झालंय', Ahmedabad Plane Crash नंतर रितेश देशमुख इमोशनल, POST
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल