Sikandar OTT Release: सलमानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, OTT वर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहता येणार?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sikandar OTT Release: सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत नाहीये.
advertisement
1/7

सलमान खानचा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘सिकंदर’ थिएटरमध्ये फारसा कमाल करू शकलेला नाही. ३० मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाकडून मोठ्या हिटची अपेक्षा होती, पण वास्तवात प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.
advertisement
2/7
सलमान खान आणि रश्मिका मंदानाची जोडी जास्त कमाल करु शकली नाही. चाहत्यांना हा सिनेमा आवडला नसून सिनेमाचे रिव्ह्यूदेखील चांगले नाहीत. त्यामुळे आता सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.
advertisement
3/7
‘सिकंदर’ लवकरच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. सामान्यतः थिएटर रिलीजनंतर 6 ते 8 आठवड्यांमध्ये ओटीटीवर रिलीज होतो. त्यामुळे हा चित्रपट 11 ते 25 मे दरम्यान नेटफ्लिक्सवर येण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, ‘सिकंदर’चे ओटीटी हक्क 85 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ही एक मोठा डील मानला जात आहे. 200 कोटींच्या बजेटमधील जवळपास अर्धी रक्कम निर्मात्यांनी ओटीटीतून वसूल केली आहे.
advertisement
5/7
भारतामध्ये ‘सिकंदर’ने आतापर्यंत 97.75 कोटींची कमाई केली आहे. तर, जागतिक बॉक्स ऑफिसवर हा आकडा 187 कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे सलमानचा हा चित्रपट थोडक्यात आपलं बजेट काढत आहे.
advertisement
6/7
रश्मिका मंदान्ना या चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय शर्मन जोशी, सत्यराज, अंजिनी धवन, प्रतिक बब्बर यांच्याही भूमिका आहेत.
advertisement
7/7
दरम्यान, सलमानचा सिकंदर सिनेमा फ्लॉप होताना पाहून लोक आता त्याची जादू संपली असल्याचं म्हणत आहे. बॉलिवूडमधून आता सलमानला सपोर्टही मिळत नसल्याचं दिसत आहे. कारण त्याच्या सिनेमासाठी कोणी जास्त पुढे येऊन सपोर्ट केलेलं पहायला मिळालं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sikandar OTT Release: सलमानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, OTT वर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहता येणार?