मुख्यमंत्री, छगन भुजबळ ते गुणरत्न सदावर्ते; संघर्षयोद्धामध्ये दिसली या नेत्यांची झलक; पाहा फोटो
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील’ असं या सिनेमाचं नाव असून तो लवकरच रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यात अनेक नेत्यांची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. पाहा त्यांचे पहिले लूक.
advertisement
1/8

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील’ असं या सिनेमाचं नाव असून तो लवकरच रिलीज होणार आहे.
advertisement
2/8
हा चित्रपट आधी येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. आता तो 21 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.
advertisement
3/8
“संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील” या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे.
advertisement
4/8
तो या भूमिकेत चपखल बसला आहे. त्याचं कौतुक होत आहे.
advertisement
5/8
तसंच या सिनेमात मराठा आंदोलनाला विरोध असणारे नेते छगन भुजबळ यांची देखील झलक पाहायला मिळाली आहे.
advertisement
6/8
छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी यांनी साकारली आहे.
advertisement
7/8
याचसोबत चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखील झलक पाहायला मिळाली आहे.
advertisement
8/8
तर ऍड. गुणरत्न सदावर्ते देखील या सिनेमात दिसणार आहेत. ही भूमिका शिवाजी दौलताडे यांनी साकारली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मुख्यमंत्री, छगन भुजबळ ते गुणरत्न सदावर्ते; संघर्षयोद्धामध्ये दिसली या नेत्यांची झलक; पाहा फोटो