TRENDING:

Shahrukh Khan: सुपरस्टार होण्याआधीचा 'तो' शाहरुख, किंग खानचे 35 वर्षापूर्वीचे हृदयाला भिडणारे PHOTO VIRAL

Last Updated:
Shahrukh Khan: एका रेल्वेच्या गेटवर उभा असलेला एक तरुण. साधे कपडे, डोळ्यात एक चमक, चेहऱ्यावर आशा… आणि मनात एकच स्वप्न "मोठं काहीतरी करायचं!" हा तरुण आहे शाहरुख खान.
advertisement
1/7
सुपरस्टार होण्याआधीचा 'तो' शाहरुख, किंग खानचे 35 वर्षापूर्वीचे PHOTO VIRAL
एका रेल्वेच्या गेटवर उभा असलेला एक तरुण. साधे कपडे, डोळ्यात एक चमक, चेहऱ्यावर आशा… आणि मनात एकच स्वप्न "मोठं काहीतरी करायचं!" हा तरुण आहे शाहरुख खान.
advertisement
2/7
शाहरुखचे तरुणपणीचे हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. निरागस चेहरा, बोलके डोळे आणि भरपूर स्वप्ने. किंग खानचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो 35 वर्षांपूर्वीचे आहेत, जे शाहरुखचा जुना मित्र अमर तलवार यांनी शेअर केले आहेत.
advertisement
3/7
हे फोटो आहेत त्या काळाचे जेव्हा शाहरुख फक्त एक "थिएटर आर्टिस्ट" होता. दिल्लीहून कोलकाताकडे थिएटर ग्रुपसोबत प्रवास करत होता. याच प्रवासात एक स्वप्न पेरलं गेलं होतं जे पुढे जाऊन लाखोंच्या मनावर राज्य करणारं होतं.
advertisement
4/7
फोटोंमध्ये शाहरुख ट्रेनच्या गेटवर उभा आहे. एकामध्ये तो हसतोय, एकामध्ये खिडकीबाहेर पाहतोय, एकामध्ये हातात कॅमेरा धरलेला आहे. आणि एकामध्ये तो आणि त्याचे मित्र एखाद्या स्टेशनवर थांबले आहेत. कोणताही स्टारडम नाही, कोणतीही सुरक्षा नाही फक्त काही मित्र, एक ट्रेन आणि बरोबर त्याच्या मनातली स्वप्नं.
advertisement
5/7
अमर तलवार यांनी या फोटोंसोबत लिहिलं "दिल्ली ते कोलकाता... 35 वर्षांपूर्वीचा प्रवास. दिव्या, दीपिका, शाहरुख, संजय... आणि मी कॅमेऱ्यामागे..."
advertisement
6/7
या फोटोंवर चाहते कमेंट करत आहेत. "हीच खरी प्रेरणा आहे!", "तो खूपच निरागस दिसतोय!", "धन्यवाद हे क्षण शेअर केल्याबद्दल!" कधी काळी ट्रेनने प्रवास करणारा शाहरुख आज आलिशान आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरतो.
advertisement
7/7
आज शाहरुख खान सुपरस्टार आहे. 'पठाण', 'जवान', 'डंकी'… आणि आता त्याचा पुढचा मोठा प्रोजेक्ट 'किंग', ज्यात त्याची मुलगी सुहानाही दिसणार आहे. पण या फोटोंनी आपल्याला त्या दिवसात परत नेलं… जेव्हा शाहरुख किंग खान, बादशाह नाहीतर फक्त एक स्वप्न पहाणारा "शाहरुख" होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shahrukh Khan: सुपरस्टार होण्याआधीचा 'तो' शाहरुख, किंग खानचे 35 वर्षापूर्वीचे हृदयाला भिडणारे PHOTO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल