Shilpa Shetty-Raj Kundra: '60 कोटी भरा मग कुठे जायचंय तर जा' शिल्पा शेट्टी राज कुंद्राला हायकोर्टाचा थेट आदेश
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Shilpa Shetty-Raj Kundra: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. या प्रकरणात शिल्पा आणि राजच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
1/7

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. या प्रकरणात शिल्पा आणि राजच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
2/7
60 कोटी फसवणूक प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने मोठा आदेश दिला आहे. कोर्टाने स्पष्ट केले आहे की, जर या शिल्पा आणि राज दांपत्याला लॉस एंजेलिस किंवा इतर कोणत्याही परदेशात प्रवास करायचा असेल, तर त्यांना प्रथम 60 कोटींची रक्कम जमा करावी लागेल.
advertisement
3/7
ही कारवाई फसवणुकीच्या प्रकरणातील FIR संदर्भात करण्यात आली आहे. शिल्पा आणि राज यांनी त्यांच्या विरोधात जारी झालेल्या लुकआऊट सर्क्युलर (LOC) रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
advertisement
4/7
हे सर्क्युलर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जारी केले होते. पोलिसांचा आरोप आहे की, या दांपत्याने SFL Fitness Private Limited आणि इतर काही कंपन्यांद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि मोठी आर्थिक हानी पोहोचवली.
advertisement
5/7
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी कोर्टात सांगितले की, त्यांनी कोणतीही फसवणूक केलेली नाही आणि त्यांचे नाव चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात ओढले गेले आहे. मात्र, न्यायालयाने सांगितले की, चौकशीदरम्यान पुरावे तपासले जाणे आवश्यक आहे.
advertisement
6/7
त्यामुळे कोर्टाने LOC तत्काळ रद्द करण्यास नकार दिला आणि परदेशात जाण्यापूर्वी ₹60 कोटी जमा करावेत, असा आदेश दिला. तपासात सहकार्य करताय म्हणून तुम्हाला अद्याप अटक नाही झालीय असं म्हणत कोर्टाने कुंद्रा कपलला फटकारलं.
advertisement
7/7
दरम्यान, शिल्पा शेट्टीला यूट्यूबचा एक इवेंटसाठी कोलंबोला जायचं आहे. या इवेंटला 25 ऑक्टोंबर ते 29 ऑक्टोबर जाण्यासाठी मागितली होती परवानगी. मात्र कोर्टानं विचारलेल्या प्रश्नांना,शिल्पा शेट्टींच्या वकिलांना समाधानकारक उत्तर देता आले नाही त्यामुळे हायकोर्टाची दोघांना चपराक लगावली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shilpa Shetty-Raj Kundra: '60 कोटी भरा मग कुठे जायचंय तर जा' शिल्पा शेट्टी राज कुंद्राला हायकोर्टाचा थेट आदेश