बिग बींचा जीवघेणा अपघात, स्मिता पाटीलला आधीच लागलेली चाहूल, त्या रात्री अभिनेत्रीनं केलेला कोणाला फोन!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Amitabh Bachchan- Smita Patil : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलला बिग बींच्या अपघाताची चागूल लागली होती. अभिनेत्रीनं मध्यरात्री घाबरून उठून फोन केला होता.
advertisement
1/10

अभिनेते अमिताभ बच्चन 83 वर्षांचे झाले. आजही ते इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांच्या आयुष्यात अनेक उतार चढाव आले. एकीकडे त्यांनी प्रसिद्धीचं शिखर पाहिलं तर दुसरीकडे आपलं मरणं.
advertisement
2/10
1982 साली कुली सिनेमाच्या सेटवर झालेला अपघात बिग बींच्या जीवावर बेतला होता. या अपघातानं सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. त्या वेळी बिग बी गंभीर जखमी झाले होते आणि देशभरात त्यांच्या जीवनासाठी प्रार्थना करण्यात आली होती. 'माझ्या चाहत्यांच्या आशीर्वादामुळे मी जिवंत आहे', असं ते स्वत: सांगतात.
advertisement
3/10
पण तुम्हाला माहितीये का दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलला बिग बींच्या अपघाताची चागूल लागली होती. अभिनेत्रीनं मध्यरात्री घाबरून उठून कोणाला फोन केला होता.
advertisement
4/10
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बींच्या अपघाताच्या एक दिवस आधी त्यांना अभिनेत्री स्मिता पाटीलचा फोन आला होता. स्मिताने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
advertisement
5/10
तिने सांगितलं की, तिला एक वाईट स्वप्न पडलं आहे. म्हणूनच ती इतक्या रात्री फोन करत आहे. त्या वेळी अमिताभ बच्चन हे बंगळुरूमध्ये 'कुली' चित्रपटाचं शूटिंग करत होते.
advertisement
6/10
बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, "मी पहाटे 2 वाजता हॉटेलमध्ये होतो. अचानक रिसेप्शनवरून फोन आला. स्मिता पाटील बोलत होती. ती म्हणाली, 'मला एक वाईट स्वप्न पडलं आहे, म्हणून मी फोन केला. तुम्ही ठीक आहात ना?'
advertisement
7/10
बिग बी म्हणाले की, मी तिला हसून उत्तर दिलं, 'मी अगदी ठीक आहे. काळजी करू नकोस.' पण दुसऱ्याच दिवशी सेटवर मोठा अपघात झाला.
advertisement
8/10
स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र अनेक सुंदर चित्रपट केले. 'नमक हलाल' हा त्यांचा सिनेमा खूप लोकप्रिय झाला. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आजही आवडते.
advertisement
9/10
‘कुली’ चित्रपटात एक फायटिंग सीन आहे. ज्यात पुनीत इस्सर यांनी अमिताभ बच्चन यांना मारलेला मुक्का इतका जोरात लागला की अमिताभ टेबलावर आदळले. टेबलाचा कोपरा थेट त्यांच्या पोटात घुसला आणि ते तिथेच बेशुद्ध पडले.
advertisement
10/10
त्यांना लगेच बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर मुंबईला हलवण्यात आलं. डॉक्टरांनी आशा सोडली होती पण परमेश्वर कृपेने ते वाचले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिग बींचा जीवघेणा अपघात, स्मिता पाटीलला आधीच लागलेली चाहूल, त्या रात्री अभिनेत्रीनं केलेला कोणाला फोन!