आधी कमल हासनसोबत केलं काम, नंतर त्यालाच आपल्या इशाऱ्यावर नाचवलं; हा मुलगा कोण!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कमल हासनच्या सिनेमात बालकलाकार म्हणून काम करणारा हा मुलगा आज त्यालात आपल्या इशाऱ्यावर नाचवतोय. हा मुलगा आहे तरी कोण?
advertisement
1/7

चित्रपटसृष्टीत कधी काय होईल आणि कधी कोण कुठून कुठे निघून जाईल काही सांगता येत नाही. एकेकाळी कमल हासनसोबत बाल कलाकार म्हणून काम करणारा मुलगा आज त्याच्यात सिनेमाचा दिग्दर्शक आहे. त्याच्या नावावर आज एक हिट सिनेमा आहे. तो मुलगा कोण आहे असा प्रश्न पडला असेल. या मुलाने फक्त कमलच नाही तर अजितसोबत रावण गँगस्टर नावाचा सिनेमाही केला.
advertisement
2/7
'सागर संगमम' हा के. विश्वनाथ दिग्दर्शित तेलुगू चित्रपट आहे आणि 1983मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट तमिळमध्ये 'सलंगाई ओली' या नावाने रिलीज झाला होता. त्यात कमल हासन, जयप्रथा, सरथबाबू आणि इतर अनेक कलाकार होते. इलयाराजाने सिनेमाला संगीत दिलं होतं. या सिनेमात, भरतनाट्यम कलाकार कमल एका मुलाला बोलावतो आणि त्याला फोटो काढायला सांगतो. तो मुलगाही चुकीचा फोटो काढतो.
advertisement
3/7
1985मध्ये आलेल्या भाग्यराज अभिनीत 'चिन्ना वीडू' या चित्रपटात हाच मुलगा काम करणार होता. तो कल्पनाच्या धाकट्या भावाची भूमिका साकारणार होता. तो अस्खलित इंग्रजीत 'माय नेम इज चक्कू' म्हणायचा. त्याच्या आणि भाग्यराजमधील सीन खूप कॉमेडी आहेत.
advertisement
4/7
चक्री तोलेटीने अशा 3-4 चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. कमल हासनच्या 'सलंगाई ओली' या चित्रपटातही बाल कलाकार म्हणून काम केलेल्या चक्री तोलेटीने 2009 मध्ये आलेल्या 'उन्नैप पोल ओरुवन' या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आणि तो चित्रपट हिट झाला. 2012 मध्ये त्याने अजितसोबत 'बिल्ला 2' हा चित्रपट दिग्दर्शित केला. अनेकांना प्रश्न पडला असेल की हा तोच लहान मुलगा आहे का?
advertisement
5/7
चक्री तोलेटीबद्दल सांगायचे तर तो मूळचा आंध्र प्रदेशचा आहे. त्याचे वडील डॉक्टर आहेत. पण त्याला सिनेमात रस होता. तो चित्रपटांसाठी पटकथा लिहिण्यासारख्या कामात गुंतला होता. यामुळेच चक्री तोलेती के. बालचंदर आणि भाग्यराज सारख्या दिग्दर्शकांशी त्यांची ओळख झाली.
advertisement
6/7
त्यांने अमेरिकेत व्हीएफएक्सचा अभ्यास केला आणि चेन्नईला आला. 2008 मध्ये 'दशावतारम' या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर परतला. पुढच्या वर्षी त्यांनी कमल हासनसोबत 'उन्नई पोल ओरुवन' हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट 'वेडनेस्डे' या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. त्यानंतर त्यांनी तेलुगूमध्ये 'ई नाडू' हा चित्रपट दिग्दर्शित केला.
advertisement
7/7
त्यांनी अजितसोबत 'बिल्ला 2' आणि सोनाक्षी सिन्हासोबत 'वेलकम टू न्यू यॉर्क' हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांने 2019 मध्ये नयनथारासोबत 'कोलायुथिर कलाम' हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांने कोणताही चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही. तो सध्या आर्टिफिशिअल इंटलेजन्सी वापरणाऱ्या care.ai नावाच्या आरोग्यसेवा कंपनीचा सीईओ आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी कमल हासनसोबत केलं काम, नंतर त्यालाच आपल्या इशाऱ्यावर नाचवलं; हा मुलगा कोण!