लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून झाली अभिनेत्री; पण घटस्फोटित अभिनेत्याशी लग्न करून गमावलं स्टारडम
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचं स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी लाखो तरुण मुंबईत पोहोचतात,पण त्यांचं स्वप्न सत्यात उतरतच असं नाही. अशीच एक अभिनेत्री आहे जिने आपली लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून अभिनयविश्वात पाऊल ठेवलं, पण तिला फारसं यश मिळालं नाही. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या.
advertisement
1/8

ही अभिनेत्री आहे एकेकाळी छोट्या पडद्यावर आपलं नाव कमावलेली अभिनेत्री एकता कौल. आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी तिनं आपली लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून अभिनयविश्वात पाऊल ठेवलं.
advertisement
2/8
एकता कौलने 'रब से सोना इश्क' या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या शोमध्ये ती 'साहिबा'च्या भूमिकेत दिसली आणि तिने आपल्या निरागसतेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
advertisement
3/8
एकता कौल, मूळची काश्मीरची आहे, तिने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी मिळवली होती. त्यानंतर तिने एमबीए करून एका ती एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती. मुंबईच्या एका कंपनीच्या नोकरी करताना तिने अभिनयात नशीब अजमावायचं ठरवलं.
advertisement
4/8
अभिनयविश्वात काम करण्यासाठी एकता कौलने नोकरी सोडली आणि 2012 मध्ये 'रब से सोना इसक' या मालिकेतून पदार्पण केलं. या मालिकेतून तिला ओळख मिळाली, पण वर्षभरातच ही लोकप्रिय मालिका बंद झाली. 'रब से सोना इश्क' बंद होताच एकता 'झलक दिखला जा' या सेलिब्रिटी डान्स शोच्या सहाव्या सीझनचा भाग बनली.
advertisement
5/8
2013 मध्ये, एकता कौल राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्या लोकप्रिय मालिका 'बडे अच्छे लगते हैं' चाही भाग होती . या मालिकेत तिने डॉ. सुहानी मल्होत्राची भूमिका साकारली होती.
advertisement
6/8
'बडे अच्छे लगते हैं' नंतर, एकता कौलने अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या. 2015-2017 दरम्यान ती 'मेरे अंगना में' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली. या मालिकेने तिला टीव्ही जगतात वेगळं स्थान मिळवून दिलं.
advertisement
7/8
एकता कौलने त्यानंतर 2018 मध्ये अभिनेता सुमीत व्याससोबत लग्नगाठ बांधली. एकता कौल ही सुमीत व्यासची दुसरी पत्नी आहे. 'ट्रिपलिंग' आणि 'पर्मनंट रूममेट्स' सारख्या वेब सीरिजमध्ये काम करणारा अभिनेता सुमीत व्यास याने 2010 मध्ये अभिनेत्री शिवानी टंकखळेशी लग्न केलं होतं पण 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
advertisement
8/8
2018 मध्ये सुमीत व्याससोबत लग्नगाठ बांधल्यानंतर तिने अभिनयातून बराच ब्रेक घेतला. 2022 मध्ये, अभिनेत्रीने वेब सीरिज 'तनव' द्वारे तिने ओटीटीवर पदार्पण केलं. एकता कौल गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण'चा एक भाग होती आणि या वर्षी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मैं अटल हूं' या चित्रपटातही ती दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून झाली अभिनेत्री; पण घटस्फोटित अभिनेत्याशी लग्न करून गमावलं स्टारडम