TRENDING:

सुनील शेट्टीची मराठमोळी सूनबाई, अहानपेक्षा आहे वयाने मोठी; किती आहे अंतर?

Last Updated:
Suniel Shetty : सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असून दोघांमध्ये वयाचं अंतर आहे.
advertisement
1/7
सुनील शेट्टीची मराठमोळी सूनबाई, अहानपेक्षा आहे वयाने मोठी; किती आहे अंतर?
सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी मराठमोळी अभिनेत्री जिया शंकर हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहान आणि जिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
2/7
सुनील शेट्टी यांनी मात्र अद्याप लेकाच्या लग्नाबाबत कोणताही माहिती दिलेली नाही. पण मराठमोळ्या अभिनेत्रीचं आपल्या घरी स्वागत करण्यास सुनील अण्णा सज्ज आहेत. दुसरीकडे मराठीमोळी अभिनेत्री सुनील शेट्टीची सून होणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
3/7
अहान शेट्टीने 2021 मध्ये 'तडप' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनय कारकि‍र्दीची सुरुवात केली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्याला आयफा पुरस्कार मिळाला होता. आता अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
advertisement
4/7
रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटाच्या माध्यमातून मराळमोळी जिया शंकर महाराष्ट्रभर पोहोचली. जिया शंकर 'बिग बॉस ओटीटी' या बहुचर्चित कार्यक्रमाचीदेखील स्पर्धक राहिली आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
advertisement
5/7
अहान शेट्टीचा जन्म 28 डिसेंबर 1995 मध्ये झाला असून जिया शंकरचा जन्म 17 एप्रिल 1995 रोजी झाला होता.
advertisement
6/7
अहान शेट्टी आणि जिया शंकर गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असून त्यांच्यात वयाचं अंतर आहे. अहान शेट्टी 29 वर्षांचा असून जिया शंकर 30 वर्षांची आहे.
advertisement
7/7
अहान शेट्टी आणि जिया शंकर आपल्या नात्याची अधिकृत कबुली कधी देणार याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दोघांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुनील शेट्टीची मराठमोळी सूनबाई, अहानपेक्षा आहे वयाने मोठी; किती आहे अंतर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल