मेहंदी सजली गं! स्वानंदीच्या हातावर रंगली आशिषच्या नावाची मेहंदी; 'आनंदी' जोडप्याचे फोटो समोर
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
सध्या मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक जोडपी लग्नबंधनात अडकत आहेत. काल गौतमी देशपांडे हिनं प्रेमाची जाहीर कबुली दिली. तिने मेहंदीचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर देखील लवकरच लग्न करणार आहे. तिच्या मेहंदीचे फोटो सध्या समोर आले आहेत.
advertisement
1/8

मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर देखील लवकरच लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा पार पडला होता.
advertisement
2/8
स्वानंदी टिकेकर इंडियन आयडॉल फेम गायक आशिष कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधणार आहे.
advertisement
3/8
आमचं ठरलं असे म्हणत दिल दोस्ती दुनियादारी मालिका फेम स्वानंदी टिकेकर हिनं प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
advertisement
4/8
आता स्वानंदी लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. 'आनंदी' मेहंदी असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
advertisement
5/8
दोघांच्या घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात साखरपुडा झाल्यावर दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.
advertisement
6/8
स्वानंदी आणि आशिषवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
advertisement
7/8
स्वानंदी टिकेकर ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक आहे.
advertisement
8/8
स्वानंदीचा होणार नवरा आशिष हा एक गायक असून त्याने इंडियन आयडॉलच्या 12 व्या सिजनमध्ये परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांची आणि परिक्षकांची वाहवा मिळवली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मेहंदी सजली गं! स्वानंदीच्या हातावर रंगली आशिषच्या नावाची मेहंदी; 'आनंदी' जोडप्याचे फोटो समोर