'हा मुर्खपणा कधी संपणार?' भारताच्या हल्ल्यानंतर स्वरा भास्कर बरळली, म्हणते 'युद्धाची मागणी करणाऱ्यांनी...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Swara Bhasker Comment On Operation Sindoor : स्वरा भास्करने भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाला 'प्रोपगंडा' म्हटले आहे. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
advertisement
1/6

पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या निर्णायक पावल्यानंतर संपूर्ण देशात सैन्याच्या धाडसाचं कौतुक होत आहे, पण याच वेळी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने युद्धावर केलेल्या टिप्पणीमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
advertisement
2/6
स्वराने आपल्या इंस्टाग्रामवर जॉर्ज ऑरवेल यांचं एक कोट शेअर करत म्हटलं, "प्रत्येक युद्ध हा प्रोपगंडा असतो. सगळी ओरड, खोटं आणि द्वेष हे तेच लोक करतात, जे प्रत्यक्षात लढत नाहीत." या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी स्वराला ट्रोल करण्यास सुरुवात केली, तर काहींनी तिच्या धाडसी मतप्रदर्शनाचं स्वागतही केलं.
advertisement
3/6
स्वराने याचबरोबर आणखी एक पोस्ट शेअर केली, "युद्धाची इच्छा करणाऱ्यांनी एकदा आपल्या कुटुंबाकडे पाहावं, आणि ठरवावं की, त्यांच्यातून कोणाला ते गमावू शकतील. कारण युद्ध केवळ सीमेवर नाही, तर तुमच्या घराबाहेरही लढलं जाईल." या भावना व्यक्त करताना स्वरा युद्धाच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत होती, हे तिच्या चाहत्यांनी ओळखलं, पण ट्रोलर्सनी मात्र तिला "देशद्रोही", "नकारात्मक मानसिकता असलेली" अशी टीका केली.
advertisement
4/6
यासोबतच स्वरा भास्करने हैदराबादमधील कराची बेकरीवर तिरंगा लावल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, 'या मूर्खपणाचा अंत कधी होईल? आपण हिंदू सिंधी लोकांना त्यांच्या मुळांसाठी शिक्षा देत आहोत. तुम्ही अशा कोणत्याही गोष्टीची कल्पना करू शकता, जी एकाच वेळी नीच आणि मूर्खतापूर्ण असेल?' असा सवाल करत तिने पुन्हा एकदा आपली मतं निर्भीडपणे मांडली.
advertisement
5/6
दुसरीकडे, 'ऑपरेशन सिंदूर' बाबत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येत आहेत. सोनाक्षी सिन्हा, करीना कपूर आणि कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींनी भारतीय सैन्याच्या या कारवाईचं आणि विंग कमांडर व्योमिका सिंग-कर्नल सोफिया कुरेशी यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
6/6
आता या सगळ्या घडामोडींमध्ये स्वरा भास्करचं युद्धाबद्दलचं मत अनेक लोकांना पटलेलं दिसत नाहीये. मात्र, स्वरा नेहमीच आपल्या स्पष्ट विचारांसाठी ओळखली जाते आणि तिने पुन्हा एकदा तेच धाडस दाखवलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर काय नवीन वाद निर्माण करते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हा मुर्खपणा कधी संपणार?' भारताच्या हल्ल्यानंतर स्वरा भास्कर बरळली, म्हणते 'युद्धाची मागणी करणाऱ्यांनी...'