Asthma Causes : ही 10 कामं करणाऱ्यांना जास्त असतो दम्याचा धोका, छोट्याशा लक्षणांकडेही करू नका दुर्लक्ष
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक लोकांना दम्याचा त्रास होतो. यामध्ये श्वास घेणे कठीण होते. दम्याची इतरही अनेक कारणं असू शकतात. परंतु, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, काही विशिष्ठ काम करणाऱ्या लोकांनाही दम्याचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो. चला पाहुया कोणते काम करणाऱ्या लोकांना दम्याचा धोका जास्त असतो आणि का..
advertisement
1/6

जे लोक हेअर ड्रेसर म्हणून काम करतात किंवा जे लोक पाळीव प्राण्यांची काळजी घेतात त्यांना दमा होण्याचा धोका अनेक पटींनी जास्त असतो. युनायटेड किंगडम (यूके) लॉ फर्म सिम्पसन मिलर यांनी हा खुलासा केला आहे. फर्मने अशा लोकांची यादी तयार केली आहे ज्यांना दम्याचा धोका जास्त आहे. यामध्ये अनेक प्रकारची कामे करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
advertisement
2/6
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, सिम्पसन मिलरचा दावा आहे की केशभूषा म्हणजेच हेअर ड्रेसिंगचे करणारे, पाळीव प्राणी, बेकरी कामगार, सफाई कामगार, मिल ऑपरेटर, मेटल वर्कर्स, फार्मास्युटिकल कामगार, केमिकल मॅन्युफॅक्चरर्स, कार्पेट मेकर्स, फूड प्रोडक्शन वर्कर्स आणि ॲडेसिव्ह उत्पादने तयार करणाऱ्या लोकांना दमा होण्याचा सर्वाधिक धोका असतो.
advertisement
3/6
या सर्व प्रकारची कामे करणारे लोक त्यांच्या कामाच्या दरम्यान अनेक प्रकारचे प्रदूषण घटक, धूळ, माती आणि धोकादायक कणांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे हे धोकादायक प्रदूषण घटक त्यांच्या शरीरात पोहोचतात. म्हणून या लोकांना दमा होण्याचा धोका वाढतो. अशा लोकांनी काम करताना विशेष खबरदारी घ्यावी.
advertisement
4/6
कामामुळे होणाऱ्या अस्थमाला व्यावसायिक दमा म्हणजेच कमर्शियल अस्थमा म्हणतात. अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. सतत प्रदूषक आणि त्रासदायक घटकांच्या संपर्कात राहिल्याने दम्याचा धोका वाढतो.
advertisement
5/6
2021 मध्ये, ब्राझीलमधून एक अभ्यास समोर आला, ज्यामध्ये असे आढळून आले की 16% लोकांना त्यांच्या व्यवसायामुळे दम्याचा त्रास आहे. आता हा आकडा वाढून सुमारे 21.5% झाला आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, जगात अस्थमाच्या रुग्णांची संख्या 26 कोटींहून अधिक आहे.
advertisement
6/6
दरवर्षी 4 लाखांहून अधिक लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात. प्रतिबंध करण्यासाठी इनहेलर आणि औषधे दिली जातात, परंतु सतत प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने ते सुरू होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Asthma Causes : ही 10 कामं करणाऱ्यांना जास्त असतो दम्याचा धोका, छोट्याशा लक्षणांकडेही करू नका दुर्लक्ष