Chia Seeds Benefits : दूध की पाणी, कशासोबत शिया सीड्स खाणं असतं जास्त फायदेशीर?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपला आहार संतुलित आणि पौष्टिक असणं खूप आवश्यक असतं. लोक हेल्दी राहण्यासाठी बऱ्याच पदार्थांची मदत घेतात. असाच एक पदार्थ म्हणजे शिया सीड्स. शिया सीड्स खाणं बऱ्याच लोकांना आवडतं. हे लोक शिया सीड्स वेगवेगळ्या पदार्थांसोबत खातात. मात्र पाणी की दूध. शिया सीड्स कशासोबत खाल्याने जास्त फायदा होतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत. मात्र तुम्हाला माहितीये. शिया सीड्स कशासोबत खाणे जास्त फायदेशीर आहे?
advertisement
1/6

शिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पाण्यात शिया सीड्स भिजवून खाल्याने तुमच्या हृदयाचे <a href="https://news18marathi.com/lifestyle/">आरोग्यही</a> सुधारू शकते.
advertisement
2/6
शिया सीड्स आणि केळीचे मिश्रण वजन कमी करण्यास मदत करू शकते. तर पाण्यात शिया सीड्स घेतल्याने पोटाशी संबंधित समस्या जसे की गॅस, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात.
advertisement
3/6
शिया सिड्समध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि अल्फा लिनोलेनिक अॅसिड हृदयासाठी फायदेशीर आहे. शिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते, यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचेला चमक येते.
advertisement
4/6
शिया सिड्समध्ये तसेच दुधामध्येही कॅल्शियम असते. त्यामुळे हे मिश्रण तुमची हाडे मजबूत करण्यास मदत करते. यामुळे थकवा आणि अशक्तपणादेखील दूर होतो.
advertisement
5/6
शिया सिड्समध्ये लोहदेखील असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. यासाठी शिया सीड्स दुधात भिजवून खावे.
advertisement
6/6
शिया सीड्स पाण्यासोबत खाल्ले किंवा दुधासोबत खाल्ले तरी यामुळे नुकसान होत नाही. झाला तर फायदाच होतो. मात्र या दोन्ही पद्धतींचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे आता तुम्हीच विचार करा तुम्हाला शिया सीड्स कशासोबत खायला आवडतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chia Seeds Benefits : दूध की पाणी, कशासोबत शिया सीड्स खाणं असतं जास्त फायदेशीर?