कोरोना अजून संपला नाही! आता लाँग कोविडचे रुग्ण, डॉक्टरही हैराण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Long Covid : कोरोना आता गेला, संपला असं सगळ्यांना वाटत आहे. म्हणून सगळे लोक निश्चिंत आहेत. पण कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. अनेक रुग्ण लाँग कोविडचा सामना करत आहेत. त्याचबरोबर तपासणी आणि उपचारात डॉक्टरांना अडचणी येत आहेत.
advertisement
1/6

कोरोना आता गेला, संपला असं सगळ्यांना वाटत आहे. म्हणून सगळे लोक निश्चिंत आहेत. पण कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. अनेक रुग्ण लाँग कोविडचा सामना करत आहेत. त्याचबरोबर तपासणी आणि उपचारात डॉक्टरांना अडचणी येत आहेत.
advertisement
2/6
भारतातील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, कोरोना बरे झालेल्या 45 टक्के रुग्णांमध्ये लाँग कोविडची लक्षणं दिसून येत आहेत. रुग्ण डॉक्टरांना सांगतात की त्यांना आता ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते कोरोना होण्यापूर्वी नव्हते.
advertisement
3/6
लाँग कोविड म्हणजे संसर्गामुळे शरीराचे अनेक भाग प्रभावित होतात. दीर्घकाळ जंतुसंसर्गामुळे शरीरात इतरही अनेक आजार उद्भवतात. खोकला, सांधे आणि स्नायू दुखणे, ब्रेन फॉग, लक्ष केंद्रीत करण्यात अडचण, दम्यासारख्या वाटणं या लक्षणांचा समावेश आहे. याशिवाय अनेकांना न्यूरोचा त्रास होतो.
advertisement
4/6
शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या मते कोविड संसर्गामुळे मेंदूच्या पेशींमध्ये जळजळ होते. मायक्रोग्लिया पेशींमध्ये नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत निद्रानाश, थकवा आणि इतर समस्या उद्भवतात.
advertisement
5/6
लाइव्ह हिंदुस्थानच्या वृत्तानुसार पुष्पवती सिंघानिया रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार नीतू जैन यांच्या मते, लाँग कोविड शोधण्यासाठी कोणतीही चाचणी नाही आणि त्यामुळे त्यावर उपचार करता येत नाहीत.
advertisement
6/6
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार, कोरोनाने गंभीरपणे संक्रमित झालेल्या रुग्णांपैकी 31 टक्के रुग्ण हे उत्तर अमेरिकेतील आहेत. याशिवाय 44 टक्के रुग्ण युरोप आणि इतर आशियातील आहेत. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)