TRENDING:

Dr. Babasaheb Ambedkar Quotes : बाबासाहेबांचे हे विचार तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठरतील प्रेरणा..

Last Updated:
भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय लोकशाहीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. डॉ. बी.आर. आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार - भारतरत्न प्रदान करण्यात आला. चला पाहूया त्यांचे काही प्रेरणादायी विचार.
advertisement
1/9
बाबासाहेबांचे हे विचार तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठरतील प्रेरणा..
डॉ. बी.आर. आंबेडकर न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध असलेले डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या पहिल्या मसुद्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचप्रमाणे अस्पृश्यांवरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आणि खालच्या जातींच्या उन्नतीसाठी त्यांनी अथक लढा दिला.
advertisement
2/9
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
3/9
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
4/9
धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धीनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धीनिष्ठ हेच होय. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
5/9
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
6/9
विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
7/9
अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनलं पाहिजे.
advertisement
8/9
शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
9/9
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dr. Babasaheb Ambedkar Quotes : बाबासाहेबांचे हे विचार तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठरतील प्रेरणा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल