Milk Benefits : योग्यवेळी प्या दूध, 'या' गंभीर त्रासांचा धोका होईल कमी! तज्ज्ञांनी सांगितले 4 फायदे
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Best Time To drink milk : असं म्हणतात दूध हे पूर्णान्न असतं. म्हणजे दूध प्यायल्यानंतर आपल्याला अनेक पोषक तत्त्व मिळतात आणि हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर असते. गरोदरपणात तर आवर्जून दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध आपल्यासाठी फायदेशीर असतं. मात्र ते कोणत्यावेळी आपण पितो, तेदेखील तितकंच आवश्यक असतं. चला पाहूया दूध कोणत्यावेळी प्यावे आणि त्याचे जबरदस्त फायदे.
advertisement
1/7

दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आयुष्यभर हाडे मजबूत ठेवते. यामुळे लोक दुधाचे सेवन करतात. काही लोक असेही आहेत, जे दूध पितात पण त्याचा फायदा होत नाही. याचा अर्थ तुम्ही योग्य वेळी दूध पीत नाही. आता प्रश्न असा आहे की दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? तुम्हाला कोणत्या समस्यांपासून आराम मिळतो? रांची RIMS चे न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. विकास कुमार यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या प्रश्नांची सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
2/7
दूध पिण्याची योग्य वेळ : तज्ञ रात्री दूध पिण्याचा सल्ला देतात. डॉ. विकास कुमार यांच्यानुसार रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. याशिवाय, झोपताना क्रियाकलाप पातळी देखील कमी होते. त्यामुळे शरीर दुधातून जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते. मात्र, दिवसभरातही दूध प्यायल्यास काहीही नुकसान होत नाही.
advertisement
3/7
रिकाम्या पोटी दूध पिणे टाळा : डॉक्टरांच्या मते, रिकाम्या पोटी दूध पिणे टाळावे. कारण रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅस होऊ शकतो. अशा परिस्थितीत पचनाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मात्र लहान मुलं कधीही दूध पिऊ शकतात. यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते आणि त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात दूध महत्त्वाची भूमिका बजावते.
advertisement
4/7
निद्रानाश टळेल : तज्ज्ञांच्या मते, सकाळी दूध पिणे चांगले की रात्री झोपण्यापूर्वी? अर्थात यावर लोकांची वेगवेगळी मते आहेत. पण तज्ञ रात्री दूध पिण्याचा सल्ला देतात. डॉ. विकास कुमार यांच्यानुसार रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
advertisement
5/7
हाडे मजबूत होतील : नियमित दूध पिणे ही एक चांगली सवय आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील स्नायू आणि हाडे मजबूत होतात. शतकानुशतके, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही प्रौढ असाल तर रात्री दूध पिणे जास्त फायदेशीर ठरेल.
advertisement
6/7
दातदुखीपासून आराम : दूध प्यायल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. वास्तविक, दूध कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, जे दातांच्या समस्या टाळते.
advertisement
7/7
ऊर्जा मिळेल : काही लोकांना थोडेसे कष्ट करूनही थकवा जाणवू लागतो. अशा लोकांसाठी दुध हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही नियमितपणे दुध प्यायलात तर तुम्ही दीर्घकाळ एनर्जीने परिपूर्ण राहाल. विशेषतः लहान मुलांना दूध पाजणे फार महत्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Milk Benefits : योग्यवेळी प्या दूध, 'या' गंभीर त्रासांचा धोका होईल कमी! तज्ज्ञांनी सांगितले 4 फायदे