TRENDING:

Husband Wife : लग्नानंतर बायको नवऱ्याकडून काय अपेक्षा करते? पुरुषांनी हे नक्की वाचावं

Last Updated:
नवऱ्याकडून तिला काही खास अपेक्षा असतात. त्या फार मोठ्या नसतात, पण मनापासून असतात. काही वेळा नवऱ्याला त्या समजत नाहीत, म्हणूनच या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
1/8
लग्नानंतर बायको नवऱ्याकडून काय अपेक्षा करते? पुरुषांनी हे नक्की वाचावं
Hus लग्न हे प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या आयुष्यातलं एक खूप खास वळण असतं. यानंकर दोघांचंही एक नवं आयुष्य सुरू होतं, नवा संसार सुरू होतो. मुलींसाठी तर हा टप्पा आणखीनच भावनिक आणि जबाबदारीचा असतो कारण ती एकदम नवीन घरात, नवीन लोकांमध्ये जाते. तिला आपल्या आई-वडिलांचं घर सोडून जावं लागतं, नवीन घरात त्यामुळे तिच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी, भावना सुरु असतात.
advertisement
2/8
अशा वेळी नवऱ्याकडून तिला काही खास अपेक्षा असतात. त्या फार मोठ्या नसतात, पण मनापासून असतात. काही वेळा नवऱ्याला त्या समजत नाहीत, म्हणूनच या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
3/8
1. भावनिक आधार हवं असतोप्रेम तर हवं असतंच, पण त्यासोबतच बायकोला हवं असतं कोणीतरी आपलं म्हणणारं, तिच्या भावना समजून घेणारं. जेव्हा ती काही बोलते, तेव्हा नवऱ्याने तिचं ऐकावं, जज न करता तिला समजून घ्यावंआणि हो, तणाव किंवा भांडण झालं, तरी नवऱ्याने तिच्या सोबत उभं राहणं खूपच महत्त्वाचं असतं. कारण त्या नवीन घरात तिचं हक्काचं माणूस हे तिच्या नवऱ्याशिवाय दुसरं कोणी नसतं.
advertisement
4/8
2. सन्मान आणि थोडंसं कौतुकबायकोला वाटतं की नवऱ्याने तिचं मत, तिचं काम आणि तिचे निर्णय यांचा आदर करावा. जसं की "आजचा स्वयंपाक भारी झाला", "तू खूप छान मॅनेज करतेस" असं एखादं साधं वाक्यसुद्धा तिच्या मनाला स्पर्श करतं. अशी छोटी कौतुकाची वाक्यं तिचं मन जिंकतात.
advertisement
5/8
3. एकत्र वेळ घालवणंकामं, जबाबदाऱ्या सगळं ठीक आहे… पण नवऱ्याने बायकोसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं. क्वालिटी टाइम म्हणजे मोठं प्लॅनिंग नाही, घरातच गप्पा मारणं, हसणं, एखादी मालिका एकत्र बघणं हेही खूप खास वाटतं. बायकोला हे जाणवायला हवं की "मी त्याच्यासाठी महत्त्वाची आहे".
advertisement
6/8
4. संयम आणि समजूतनवीन घर, नवीन माणसं, सगळं सांभाळायला वेळ लागतो. अशा वेळी नवऱ्याने तिला चिडचिड न करता, समजून घेत साथ द्यावी, हे ती मनापासून अपेक्षित ठेवते. जर तो तिला समजून घेत असेल, तर त्यांचं नातं अजून घट्ट होतं.
advertisement
7/8
5. प्रेम आणि आपुलकीप्रेम हे नात्याचं मूल आहे. नवऱ्याच्या छोट्या छोट्या कृतीमधून जर तिला प्रेम जाणवलं जसं एखादी मिठी, हळूच दिलेलं गिफ्ट, किंवा सरप्राईज फोन कॉल, तर ती खूप खुश होते. बायकोला शब्दांपेक्षा वागण्यातून प्रेम हवं असतं.
advertisement
8/8
बायकोला फार मोठ्या अपेक्षा नसतात फक्त नवऱ्याने तिला समजून घ्यावं, थोडा वेळ द्यावा, आणि तिला आदराने वागवावं… एवढंच. छोट्या छोट्या गोष्टीतच संसाराचं खरं सुख लपलेलं असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Husband Wife : लग्नानंतर बायको नवऱ्याकडून काय अपेक्षा करते? पुरुषांनी हे नक्की वाचावं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल