तुम्ही बनावट आलं खात नाही ना? तर ही आहे 'अस्सल आलं' ओळखण्याची खास ट्रिक
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
हिवाळ्यात आलं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे सर्दी-खोकला कमी होतो आणि प्रतिकारशक्ती वाढते. मात्र, बनावट आलं खाल्ल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आलं खरेदी करताना त्याचा वास, साल, आणि पोत तपासून अस्सल असल्याची खात्री करा.
advertisement
1/4

हिवाळ्यात आलं खाल्ल्यामुळे सर्दी-खोकला आणि पचनाचे आजार दूर होतात. आलं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असून, आलं चहा किंवा पाण्यातून घेता येते.
advertisement
2/4
आलं चहा किंवा आलं पाणी घेतल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. हिवाळ्यात व्हायरल आजारांची शक्यता जास्त असते. त्यामुळे आहारात आलं समाविष्ट केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. पचन बिघडणे, गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर आलं फायदेशीर ठरते. आलं चघळल्याने पचनसंस्था सुधारते.
advertisement
3/4
बनावट आलं खाल्ल्यास होणारे दुष्परिणाम : आलं स्वाद वाढवण्यासाठी आणि शरीराला उष्णता देण्यासाठी उपयुक्त आहे. पण बनावट आलं खाल्ल्यास आरोग्याला अनेक प्रकारे हानी होऊ शकते. त्यामध्ये उलटी किंवा मळमळ होणे, पोटाचे विकार, तोंडात जळजळ होणे, रक्त पातळ होणे, तोंडाच्या जखमा, चेहऱ्यावर डाग... असे दुष्परिणाम दिसून येतात.
advertisement
4/4
अस्सल आलं कसं ओळखाल? चमकदार आलं खरेदी नका करू. जास्त गुळगुळीत व स्वच्छ दिसणारे आलं डिटर्जंट किंवा आम्ल वापरून स्वच्छ केलेले असू शकते. आलं खरेदी करण्याआधी त्याचा तुकडा घ्या आणि वास घ्या. जर वास उग्र असेल, तर आलं खरेदी करा. आलं सोलताना हाताला चिकटल्यास आणि उग्र वास आल्यास ते अस्सल आहे. पण जर आलं खडबडीत वाटले, तर ते बनावट असू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
तुम्ही बनावट आलं खात नाही ना? तर ही आहे 'अस्सल आलं' ओळखण्याची खास ट्रिक