TRENDING:

तेल की तूप, जेवणात नेमकं काय वापरावं? आरोग्यासाठी काय चांगलं?

Last Updated:
भारतीय किचनमध्ये विविध मसाल्यांचा वापर होतो. जेवणात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थात औषधी गुणधर्म दडलेले असतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. काहीजण जेवणात तेलाचा वापर करतात, तर काहीजण तूप वापरतात. (रिया पांडे, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
1/5
तेल की तूप, जेवणात नेमकं काय वापरावं? आरोग्यासाठी काय चांगलं?
विशेषतः गोडाच्या पदार्थांमध्ये तूप घातलं जातं आणि रोजचं जेवण तेलाचं असतं. तर, काहीजण रोजच्या जेवणातही तूप वापरतात. या दोन्हीपैकी आरोग्यासाठी नेमकं काय फायदेशीर आहे, याबाबत डॉक्टर काय सांगतात जाणून घेऊया.
advertisement
2/5
डॉक्टर मुकेश गुप्ता यांनी सांगितलं की, तेल आणि तूप हे दोन्ही शरिरासाठी फायदेशीर असतात. त्यात पोषक तत्त्व भरभरून असतात, मात्र अति तेलकट पदार्थांचा वापर हा शरिरासाठी हानीकारक ठरू शकतो.
advertisement
3/5
तेलात फॅटी ऍसिड असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्या तुलनेत तुपात फॅटी ऍसिडचं प्रमाण कमी असतं. याउलट तुपात फॅट असतात जे हृदयासाठी धोकादायक ठरतात. तरीही तेल असो किंवा तूप असो, त्याचा योग्य आणि प्रमाणात वापर झाला तरच ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे या दोन्ही पदार्थांचा शक्य होईल तेवढा कमी वापर करावा, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
4/5
त्याचबरोबर कोणत्याही तेलाचा किंवा तुपाचा मांसाहारी पदार्थांमध्ये जपून वापर करावा. जर या पदार्थांमध्ये जास्त तेल, तूप घातल्यास कोलेस्ट्रॉल किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. अति तेलकट, अति तिखट पदार्थ आरोग्यासाठी प्रचंड धोक्याचे असतात.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
तेल की तूप, जेवणात नेमकं काय वापरावं? आरोग्यासाठी काय चांगलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल