TRENDING:

चिकन, मटण खाण्याचंही असतं योग्य वय, लहान मुलांना नेमकं कोणत्या वयापासून द्यावं?

Last Updated:
अनेक घरांमध्ये कुटुंबातले सर्व सदस्य चिकन, मटणावर अगदी ताव मारतात. हाडकं चाटून पुसून खातात, नळ्याही मनसोक्त चोखतात. तुम्हाला माहितीये का, मांसाहार पचायला जरा जड असतं, त्यामुळे ते कोणी किती खावं याचं योग्य प्रमाण आहारतज्ज्ञ सांगतात. 
advertisement
1/5
चिकन, मटण खाण्याचंही असतं योग्य वय, लहान मुलांना नेमकं कोणत्या वयापासून द्यावं?
तज्ज्ञ म्हणतात, अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मांसाहारी पदार्थ खाऊ शकतात. मात्र ते योग्य प्रमाणातच असायला हवे. हे प्रमाण नेमकं किती असतं जाणून घेऊया.
advertisement
2/5
लहान बाळाला हाडं खायला देण्यापेक्षा किंवा मोठमोठे पिस देण्यापेक्षा सूप द्यावं. ज्यामुळे त्यांची हाडं भक्कम होतात आणि खाताना काही त्रासही होत नाही. तर, 5 वर्षांवरील बालकांना मटण खायला देऊ शकता.
advertisement
3/5
वयोवृद्धांनी एकावेळी चिकन किंवा मटणाचे जास्तीत जास्त 3 ते 4 पिस खावे. तसंच गरोदर महिलाही मांसाहार करू शकतात, मात्र त्यांनी आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं तज्ज्ञ सांगतात.
advertisement
4/5
आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मासे, चिकन, मटण, अंडी यातून शरीराला भरभरून पोषक तत्त्व मिळतात. मात्र ते ताजं असायला हवं, नाहीतर अन्नपचनासंबंधी त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर मांसाहार पचायला जड असल्यामुळे ते दुपारी खाणं योग्य मानलं जातं.
advertisement
5/5
मांसाहार कधी करावा, किती प्रमाणात करावा हे पाळण्यामागे केवळ त्याचं व्यवस्थित पचन व्हावं एवढाच उद्देश आहे. लहान मुलं आणि वयोवृद्धांपेक्षा तरुणांची पचनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. त्यामुळे ते मनसोक्त मांसाहार करू शकतात, असं आहारतज्ज्ञ सांगतात. परंतु कोणत्याही पदार्थाचा अतिरेक बरा नाही, हे लक्षात ठेवावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
चिकन, मटण खाण्याचंही असतं योग्य वय, लहान मुलांना नेमकं कोणत्या वयापासून द्यावं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल