Happy Mothers Day Quotes : जगात सगळ्यात भारी आपली आई, मदर्स डेसाठी हटके कोट्स
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Mothers Day Quotes In Marathi : आई आणि मुलांचे नाते हे या जगातील सर्वात सुंदर नाते आहे, जे कोणत्याही अटीशिवाय आणि कोणत्याही अपेक्षाशिवाय अपार प्रेमाने भरलेले आहे. आईचे प्रेम, वात्सल्य आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी असे काही क्वोट्स घेऊन आलो आहोत, जयद्वारे तुम्ही तुमच्या आईवरचे प्रेम व्यक्त करू शकता.
advertisement
1/12

दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो, मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त आई..
advertisement
2/12
आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी..
advertisement
3/12
आईसारखा चांगला टिकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखा कोणी नाही..
advertisement
4/12
दुःख विसरण्यासाठी जगातील सगळ्यात पावरफुल औषध आईला मारलेली मिठी..
advertisement
5/12
मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई..
advertisement
6/12
स्वतःआधी तुमचा विचार करते ती म्हणजे आई..
advertisement
7/12
विधात्याची एक उत्तम कलाकृती तू अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही तुला शतशः प्रणाम आई..
advertisement
8/12
आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका..
advertisement
9/12
जगात असे एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई..
advertisement
10/12
कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई..
advertisement
11/12
हीच इच्छा माझी की, कितीही वेळा होईल जन्म माझा, तूच हवीस कारण तू आहेस माझा जन्मोजन्मीचा ठेवा..
advertisement
12/12
हजार जन्म घेतले तरी एका जन्माचेही ऋण फिटणार नाही, आई लाख चुका होतील माझ्याकडून पण तुझं प्रेम कधीच आटणार नाही..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Mothers Day Quotes : जगात सगळ्यात भारी आपली आई, मदर्स डेसाठी हटके कोट्स