TRENDING:

Health Tips : मटण खाल्ल्याने खरंच कॅन्सर होतो का? पाहा काय आहे सत्य आणि तज्ज्ञांचे मत..

Last Updated:
Red Meat Side Effects : नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांची आपल्याकडे कमतरता नाही. बरीच लोक आवडते म्हणून मांस खातात तर काही लोक शरीराच्या पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी नॉनव्हेजचा आपल्या आहारात समावेश करतात. मात्र कोणत्या प्रकारचे मांस आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते नुकसानदायक हे माहित असणं आवश्यक आहे. लाल मांसाविषयी असे बोलले जाते की, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. आज आपण यामागचे सत्य जाणून घेणार आहोत.
advertisement
1/7
मटण खाल्ल्याने खरंच कॅन्सर होतो का? पाहा काय आहे सत्य आणि तज्ज्ञांचे मत..
लाल मांस म्हणजे लहान आणि मोठ्या प्राण्यांच्या मांसामुळे कर्करोग होऊ शकतो. हे अनेक अभ्यासांमध्ये सांगितले गेले आहे. मात्र हे देखील खरे आहे की, लाल मांसामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
advertisement
2/7
भारतात लाल मांसाचा वापर कमी आहे. पण जगाच्या सर्व भागांमध्ये लाल मांसाचा वापर खूप जास्त आहे. अशा स्थितीत लाल मांस खाल्ल्याने खरेच पोटाचा कर्करोग होऊ शकतो का? असा प्रश्न निर्माण होतो. तसेच लाल मांस किती प्रमाणात खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
advertisement
3/7
किती लाल मांस खाणं सुरक्षित? : ब्रिटिश हेल्थ सर्व्हिसने त्यांच्या अभ्यासाच्या आधारे सांगितले की, लाल मांसाचे जास्त सेवन केल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. विज्ञान देखील हे सत्य मानते की, लाल मांस प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. लाल मांस मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्यातून होणारा धोका कमी असतो.
advertisement
4/7
म्हणूनच ब्रिटीश आरोग्य सेवेने रेड मीट खाण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यात म्हटले आहे की, जे लोक दररोज सरासरी 90 ग्रॅम शिजवलेले लाल मांस किंवा प्रक्रिया केलेले मांस खातात त्यांनी ते 70 ग्रॅमपेक्षा कमी केले पाहिजे. असे न केल्यास पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
advertisement
5/7
जे लोक 70 ग्रॅमपेक्षा कमी रेड मीट किंवा प्रोसेस्ड मीट खातात, त्यांचा धोका खूप कमी होतो. पोटाचा कर्करोग टाळण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपले वजन नेहमी संतुलित ठेवणे, जास्तीत जास्त सक्रिय राहण्याचा प्रयत्न करणे, सिगारेट आणि अल्कोहोलपासून दूर राहणे.
advertisement
6/7
लाल मांस म्हणजे कोणते? : मोठ्या आणि लहान प्राण्यांच्या मांसाला रेड मीट म्हणतात. यामध्ये म्हैस, मेंढी, डुक्कर, बकरी, वासरू, हरण इत्यादींच्या मांसाचा समावेश होतो. त्याचबरोबर लाल मांसामध्ये चिकन, बदक, अनेक प्रकारचे खाद्य पक्षी आणि ससा यांचाही समावेश होतो.
advertisement
7/7
प्रक्रिया केलेले मांस म्हणजे काय? : प्रक्रिया केलेले मांस मीठ आणि इतर संरक्षकांचा वापर करून धुरात शिजवले जाते आणि बरेच दिवस ठेवले जाते. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात, जे पॅकेटमध्ये बंद करतात आणि दीर्घकाळ टिकवले जातात. भारत, नेपाळ किंवा इतर काही देश वगळता जवळपास सर्वच देशांमध्ये प्रक्रिया केलेले मांस दीर्घकाळ टिकणाऱ्या पॅकेटमध्ये विकले जाते. परंतु प्रक्रिया केलेले मांस हे लाल मांसापेक्षा वाईट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : मटण खाल्ल्याने खरंच कॅन्सर होतो का? पाहा काय आहे सत्य आणि तज्ज्ञांचे मत..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल