TRENDING:

औषधं न खाता वाढवा रोगप्रतिकारक शक्ती; येऊद्या आजार, तुम्ही असाल लढायला तयार!

Last Updated:
काही फळं चवीला एवढी स्वादिष्ट लागतात की, ती बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटतं. बऱ्याचदा असं चिंच आणि बोरांबाबत होतं. करवंदही काही कमी नाही. कच्ची आणि पिकलेली दोन्ही करवंद चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात. मीठ, मसाला लावून तर काही विचारायलाच नको अहाहा, जिभेवर चघळतच राहावसं वाटतं. तुम्हाला माहितीये का, करवंद फक्त चवीला छान नसतात, तर आरोग्यासाठीसुद्धा हे फळ अतिशय फायदेशीर आहे.
advertisement
1/5
औषधं न खाता वाढवा रोगप्रतिकारक शक्ती; येऊद्या आजार, तुम्ही असाल लढायला तयार!
अनेकजण करवंदाचं लोणचं बनवतात. करवंदात साखर मुरून तयार झालेलं हे लोणचं किती भारी लागत असेल याची कल्पना करूनच मन तृप्त होतं. काहीजण भाजीतही करवंदाचा वापर करतात.
advertisement
2/5
आयुर्वेदिक डॉक्टर निधी मिश्रा सांगतात, करवंदांमध्ये व्हिटॅमिन सी, बी आणि आयर्न भरपूर असतं. शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असतं. तर, आजारांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे.
advertisement
3/5
करवंद पोटासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं. शिवाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठीही करवंद खाण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
4/5
<a href="https://news18marathi.com/lifestyle/karvand-pickle-recipe-mhij-1227987.html">करवंदांमध्ये</a> भरपूर अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे आरोग्यासंबंधातील अनेक तक्रारी दूर होतात. शिवाय यात मॅग्नेशियमचं प्रमाणही चांगलं असतं, ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/healthy-ways-to-gain-weight-mhij-1229319.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/is-drinking-tea-on-empty-stomach-increases-risk-of-cancer-read-doctors-opinion-mhij-1228245.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
औषधं न खाता वाढवा रोगप्रतिकारक शक्ती; येऊद्या आजार, तुम्ही असाल लढायला तयार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल