निरोगी जीवनासाठी करा शरीराची आतून स्वच्छता, उपाशीपोटी प्या हा आरोग्यदायी काढा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे शरीरात हळूहळू हानिकारक पदार्थ जमा होऊ लागतात. अशा परिस्थितीत वेळोवेळी शरीराची अंतर्गत स्वच्छता आवश्यक असते. अन्यथा हे हानिकारक पदार्थ अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकतात. आयुर्वेदात शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी अनेक पद्धती सांगितल्या आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांनी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध घटकांची माहिती दिलीय.
advertisement
1/5

आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडे आणि वनस्पती आहेत. ज्याचा वापर करून आपण शरीर डिटॉक्स करू शकतो. सहज उपलब्ध होणारे पान, तुळशीची पाने, हळद, आले यांचा आयुर्वेदिक पद्धतीने वापर केल्यास शरीराची अंतर्गत स्वच्छता होण्यास मदत होते, असे कोडरमा येथील आयुर्वेदिक डॉक्टर प्रभात कुमार यांनी सांगितलं.
advertisement
2/5
तुळशीची चार पाने एका ग्लास पाण्यात उकळून घ्या आणि अर्धा ग्लास शिल्लक राहिला की रिकाम्या पोटी सेवन करा. यामुळे शरीरातील अंतर्गत अवयव स्वच्छ होतात.
advertisement
3/5
भाज्यांमध्ये अद्रक वापरल्याने खोकला आणि सर्दी दूर होते. तसेच शरीराला आतून स्वच्छ करते. जेव्हा शरीरात हानिकारक घटकांचे प्रमाण वाढते. तेव्हा लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो, असेही डॉक्टरांनी सांगितले.
advertisement
4/5
अशा स्थितीत काळ्या मिरीचे चार दाणे आणि आले 5 ग्रॅम घेऊन एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. अर्धा ग्लास शिल्लक राहिल्यावर चहा प्रमाणे प्यावे.
advertisement
5/5
शरीर डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांच्या मिश्रणातून तयार केलेला काढा सकाळी दात घासल्यानंतर रिकाम्या पोटी घ्यावा. याच्या सेवनाने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो आणि शरीराची अंतर्गत स्वच्छताही होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
निरोगी जीवनासाठी करा शरीराची आतून स्वच्छता, उपाशीपोटी प्या हा आरोग्यदायी काढा