दीर्घकाळ तारुण्याचं रहस्य, केळीच्या पानावर जेवणाचे हे फायदे माहितीयेत का?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
हिंदू धर्मात केळीच्या झाडाला पवित्र मानलं जातं. केळीच्या पानावर जेवणाचेही खूप फायदे आहेत.
advertisement
1/7

केळीच्या पानामध्ये जेवण वाढण्याची पारंपरिक प्रथा ही अजूनही आपल्याकडे आहे. दक्षिण भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं. तसंच नैवेद्य, सवाष्ण आणि ब्राह्मण भोजन अशा धार्मिक कार्यक्रमांत जेवण केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आहे.
advertisement
2/7
या प्रथेमागे धार्मिक कारण तर आहेच शिवाय आयुर्वेदिक फायदेही आहेत. याबाबतच <a href="https://news18marathi.com/pune/">पुणे</a> येथील आयुर्वेद आणि ज्योतिष अभ्यासक राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो. केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते, असे जोशी सांगतात.
advertisement
4/7
खरं तर केळीच्या पानामध्ये जेवणं हे हजारो वर्षापासून सुरु असलेली परंपरा आहे. भारतातील बऱ्याच भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो. यामागे धार्मिक तसेच आयुर्वेदिक कारणही आहे. केळीच्या पानावर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत.
advertisement
5/7
केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज, पुरळ, फोडं अशा समस्या दूर होतात.
advertisement
6/7
केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात 'एपिगालोकेटचीन गलेट' आणि इजीसीजीसारखे 'पॉलिफिनोल्स अँटिऑक्सीडेंट' आढळतात. याच पानांमार्फत अँटिऑक्सीडेंट आपणास मिळतात. यामुळे त्वचा दिर्घकाळापर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते. मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो. केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोपे जाते, असे जोशी सांगतात.
advertisement
7/7
केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो. केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाकला तर फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात. असे वैद्यकीय दृष्ट्या अनेक फायदे आहेत, अशी माहिती राजेश जोशी यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
दीर्घकाळ तारुण्याचं रहस्य, केळीच्या पानावर जेवणाचे हे फायदे माहितीयेत का?