TRENDING:

तुम्हालाही मिळू शकतं चंद्रासारखं तेज, घरच्या घरी बनवा 3 पदार्थांनी जबरदस्त पेस्ट

Last Updated:
Skin care tips: सुंदर दिसण्यासाठी आपण विविध महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. परंतु कधीकधी असं वाटतं की, 'जुनं तेच सोनं'. खरोखर, आयुर्वेदात दिलेल्या काही घरगुती उपायांनी आपण आपल्या त्वचेवरील नैसर्गिक तेज जपू शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. (आशीष कुमार, प्रतिनिधी)
advertisement
1/7
तुम्हालाही मिळू शकतं चंद्रासारखं तेज, घरच्या घरी बनवा 3 पदार्थांनी जबरदस्त पेस्ट
हळद, केवड्याचं पाणी (केवडा जल) आणि कडूलिंबाची पेस्ट डागांवर, सुरकुत्यांवर रामबाण मानली जाते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेस्टमुळे त्वचेत खोलवर रुजलेली घाण सहज निघते. त्यामुळे त्वचा आतून उजळण्यास मदत मिळते.
advertisement
2/7
तज्ज्ञ राजकुमार यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, हळदीत करक्यूमिन नामक अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेवरील डाग हळूहळू पुसट व्हायला मदत मिळते. त्वचारोगांवर हळदीचा वापर अगदी प्राचीन काळापासून केला जातो.
advertisement
3/7
कडूलिंबात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. यामुळेदेखील त्वचा आतून स्वच्छ होते आणि डागांवर, जखमांवर आराम मिळतो.
advertisement
4/7
केवड्याच्या पाण्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते, शिवाय त्वचेला ओलावा मिळतो. केवड्याच्या पाण्यात अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेतील विषाणू नष्ट होतात. परिणामी जखमांवर लवकर आराम मिळतो.
advertisement
5/7
हळद, केवडा पाणी आणि कडूलिंबाची पेस्ट घरच्या घरी आपण सहज बनवू शकतो. परंतु प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असल्यामुळे कोणाला या पेस्टचा परिणाम लवकर अनुभवायला मिळतो, तर कोणाला उशिरा अनुभवायला मिळतो, असं राजकुमार म्हणाले.
advertisement
6/7
सर्वात आधी कडूलिंबाची ताजी पानं पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. मग वाटून त्यांची पेस्ट बनवावी. आता एका वाटीत हळद, कडूलिंबाची पेस्ट आणि केवडा पाणी घेऊन हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करावं. मग ही पेस्ट त्वचेवरील डागांवर लावावी. 20-30 मिनिटं पेस्ट त्वचेवर सुकू द्यावी, त्यानंतर कोमट पाण्यानं त्वचा धुवून घ्यावी. जवळपास 7 दिवस हा उपाय नियमित करावा. त्यामुळे चांगला निकाल मिळू शकतो.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
तुम्हालाही मिळू शकतं चंद्रासारखं तेज, घरच्या घरी बनवा 3 पदार्थांनी जबरदस्त पेस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल