Interesting Facts : कपड्यांची साईज XS, XL किंवा XXL मध्ये असते, पण यातल्या 'X' चा नेमका अर्थ काय?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आपण जेव्हा कपडे खरेदी करायला जातो तेव्हा कपड्यांची साईज हल्ली आकड्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहिलेली असते. XS, XL किंवा XXL अशा वेगवेगळ्या साईजमध्ये कपडे लावलेले असतात. मात्र यामधील 'X' या अक्षराचा नेमका अर्थ काय आहे. हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया.
advertisement
1/6

बऱ्याचदा आपल्याला काही परीक्षांमध्येही असे प्रश विचारले जातात. मात्र आपल्यालाही काही गोष्टींची माहिती असायला हवी सामान्य ज्ञान म्हणून. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक इंटरेस्टिंग विषयाबद्दल माहिती देत आहोत. ते म्हणजे कपड्यांच्या साईजमधील 'X' चा नेमका अर्थ काय असतो.
advertisement
2/6
तुम्ही पहिलेच असेल की, जेव्हाही आपण कपडे खरेदी करायला जातो तेव्हा शर्ट किंवा इतर कपड्यांवर त्याचा आकार म्हणजेच साईज लिहिलेली असते. आपण सगळेच कमी-अधिक प्रमाणात XL XXL या शब्दांशी परिचित आहोत.
advertisement
3/6
खरं तर, 'X' म्हणजे एक्स्ट्रा आणि 'L' म्हणजे मोठ्या कपड्यांचे आकार XL, XXL. म्हणजेच XL चा अर्थ एक्स्ट्रा लार्ज असा होतो तर XXL म्हणजे एक्स्ट्रा एक्स्ट्रा लार्ज. आकार श्रेणी दर्शवण्यासाठी हा X वापरला जातो.
advertisement
4/6
सामान्यतः XL आकाराच्या शर्टची साईज 42 इंच ते 44 इंच असते. त्याचप्रमाणे, XXL शर्ट किंवा ड्रेसच्या बाबतीत, साईज सामान्यतः 44 इंच ते 46 इंच असते. जर तुम्हाला तुमच्या शर्टची साईज माहित असेल तर तुम्ही XXL पाहून शर्ट तुम्हाला फिट होईल की नाही हे समजू शकता.
advertisement
5/6
त्याचप्रमाणे XS SM आणि L देखील आकार आहेत. अतिरिक्त लहान, लहान, मध्यम आणि मोठे याचा अर्थ असा होतो की, एक सर्वात लहान आहे, एक थोडा मोठा आहे आणि एक त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे.
advertisement
6/6
या सैजपेक्षाही मोठ्या साईजचे कपडे कंपन्या बनवतात. त्या बाबतीत मात्र हा फरक अगदी किरकोळ मानला जातो. पण हा एक्स शर्ट किंवा शर्टचा आकार सहज समजण्यासाठी सर्व कपड्यांमध्ये वापरला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Interesting Facts : कपड्यांची साईज XS, XL किंवा XXL मध्ये असते, पण यातल्या 'X' चा नेमका अर्थ काय?