Breakfast Recipe : रोज स्प्राउट्स खाण्याचा आलाय कंटाळा? बनवा स्प्राउट्स डोसा, नाश्त्याची चव वाढेल
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
मूग डाळ ही पोषक तत्वांनी भरपूर असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे बरेच लोक मूग डाळसह स्प्राउट्स खाणे पसंत करतात. परंतु काहीवेळा नुसते स्प्राउट्स खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही स्प्राउट्स पासून गरमागरम डोसा बनवू शकता. तेव्हा स्प्राउट्स डोसाची खास रेसिपी जाणून घ्या.
advertisement
1/4

स्प्राउट्स चीला बनवण्यासाठी सामग्री : दीड कप भिजवलेली मूग डाळ, 1 कप बारीक चिरलेली पालक, ½ कप बेसन, 2-3 चमचे तेल, 1 चिमूटभर हिंग, ¼ टीस्पून ओरेगॅनो, ½ चमचा लाल तिखट, ½ चमचा धनेपूड, ½ चमचा धनेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, दीड इंच किसलेले आले आणि अर्धा चमचा मीठ.
advertisement
2/4
स्प्राउट्स चीला बनवण्यासाठी प्रथम मोड आलेली मूग डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. मग त्यात थोडे बेसन घाला. मग त्यात पाणी घालून पाळत पीठ बनवा. यानंतर भांड्यात मुगाच्या डाळीची पेस्ट घाला. मग पालक भाजी, कोशिंबीर, हिंग, लाल मिरची, धणे पूड, हिरवी मिरची, इत्यादी सर्व गोष्टी चांगल्या मिसळून घाला.
advertisement
3/4
तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर डोश्याचे पीठ पसरावा. मग डोश्याच्या आसपास तेल टाका आणि त्यावर झाकण ठेऊन थोडावेळ शिजवा. 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवल्यावर ते उघडून डोसा शिजला आहे की नाही ते पाहा. एका बाजूने डोसा शिजल्यावर तो पलटून दुसऱ्या बाजूने नीट शिजवून घ्या. मग डोसा गोल्डन ब्राऊन झाला की तो खा.
advertisement
4/4
मूगडाळीचा डोसा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या तिखट चटणी सोबत खाऊ शकता. यामुळे डोश्याची चव आणखीन वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Breakfast Recipe : रोज स्प्राउट्स खाण्याचा आलाय कंटाळा? बनवा स्प्राउट्स डोसा, नाश्त्याची चव वाढेल