हे आहे जगातील सर्वात गोड फळ! पण मधुमेहींसाठी आहे वरदान; खासियत काय?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
डॉक्टर नेहमीच शुगरच्या रुग्णांना गोड फळांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा फळाविषयी सांगणार आहोत. जे साखरेपेक्षा 300 पट गोड असुनही शुगर फ्री आहे.
advertisement
1/5

मुंबई - आहारात ताज्या फळांचा समावेश असावा असं म्हणतात पण अनेकदा काही फळं मधुमेहींना खाता येत नाहीत. पण एक फळ असं आहे जे खूप गोड असूनही मधुमेहींनाही खाता येऊ शकतं. हे फळ साखरेपेक्षा 300 पट गोड आहे.
advertisement
2/5
या फळाचं नाव आहे मॉंक फ्रूट. या फळामध्ये अमिनो ॲसिड, फ्रुक्टोज, खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. शीतपेयं, शिजवलेलं किंवा बेक केलेल्या अन्नात वापरल्यानंतरही फळाची गोडी कायम राहते.
advertisement
3/5
मॉंक फ्रुटचं उत्पादन सर्वात प्रथम चीनमध्ये झालं. परंतु आता पालमपूरमध्ये सीएसआयआर आणि एनबीपीजीआरच्या मंजुरीनंतर आता भारतातही मोठ्या प्रमाणावर मॉंक फ्रुटची लागवड केली जात आहे.
advertisement
4/5
मॉंक फ्रूटच्या पावडरचा स्वीटनर म्हणूनही वापर करतात. साखरेला पर्याय म्हणून हे फळ एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो, कारण त्यात शून्य कॅलरीज असतात आणि त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
advertisement
5/5
तुम्हालाही गोड खुप आवडतं आणि डायबिटीजमुळे तुम्ही खाऊ शकत नसाल. तर हे फळ तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण शुगर फ्री असल्याने तुम्हाला याचा धोका नाही. (डायबिटीजच्या रुग्णांनी हे फळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
हे आहे जगातील सर्वात गोड फळ! पण मधुमेहींसाठी आहे वरदान; खासियत काय?