Relationsip : लग्न झालेल्या लोकांचे का सुरु होतात अफेअर? ऑफिस कलिगशीच बऱ्याचदा का पडतात प्रेमात?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अलीकडे ऑफिस अफेअरचे प्रकार वाढताना दिसत आहेत आणि हे फक्त तरुणांपुरते मर्यादित नसून विवाहित लोकांमध्येही हे प्रमाण वाढत आहे.
advertisement
1/8

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लग्न ही फक्त दोन व्यक्तींची जबाबदारी राहिलेली नाही, तर ती करिअर, कामाचा ताण आणि वैयक्तिक आयुष्य यांच्या दरम्यान समतोल साधण्याचं आव्हानही बनली आहे.
advertisement
2/8
हल्ली लोक घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतात, कामाच्या ताणामुळे घरच्यांसाठी वेळ उरत नाही, आणि हाच दुरावा पुढे जाऊन वेगळ्या प्रकारच्या नात्यांचा पाया रचतो.
advertisement
3/8
अलीकडे ऑफिस अफेअरचे प्रकार वाढताना दिसत आहेत आणि हे फक्त तरुणांपुरते मर्यादित नसून विवाहित लोकांमध्येही हे प्रमाण वाढत आहे.
advertisement
4/8
अनेक कंपन्यांमध्ये 9 ते 10 तास काम करण्याची पद्धत आहे. एकत्र बसून एकाच ताणाखाली काम केल्यामुळे सहकाऱ्यांमध्ये जवळीक निर्माण होते. सुरुवातीला ही मैत्री असते, पण वेळ जाऊ लागला की ती नकळत भावनिक नात्यात रूपांतरित होते.
advertisement
5/8
आजकाल कपल्स घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त वेळ घालवतात. परिणामी, त्यांच्याकडे एकमेकांसाठी वेळ उरत नाही. यामुळे भावनिक जोडणी कमी होत जाते आणि रिक्तता भरण्यासाठी ऑफिसमधील सहकारीच मानसिक आधार बनू लागतात.
advertisement
6/8
आपल्या दिवसाचा बहुतांश वेळ ऑफिसमध्ये जातो. त्यामुळे सहकाऱ्यांशी गप्पा, फीलिंग्स शेअर करणं, कामाचे ताणतणाव बोलून मोकळं होणं यामुळे हळूहळू एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर तयार होतो आणि तिथून अफेअरची सुरुवात होते.
advertisement
7/8
सुरुवातीला ऑफिस अफेअर आकर्षक आणि गोड वाटू शकतं, पण कालांतराने ते केवळ हानीच करतं. अशा नात्यांमुळे व्यावसायिक (प्रोफेशनल) आणि वैयक्तिक (पर्सनल) आयुष्य दोन्ही बिघडतात. विश्वास कमी होतो, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि करिअरवरही परिणाम होतो.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Relationsip : लग्न झालेल्या लोकांचे का सुरु होतात अफेअर? ऑफिस कलिगशीच बऱ्याचदा का पडतात प्रेमात?