Yoga Benefits : तरुणपणीच डोक्यावर टक्कल पडतंय? रोज फक्त 5 मिनिटं करा 'हा' योग, केस गळणं थांबेल
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
हवेतील प्रदूषण, धूळ, माती, तसेच ताणतणाव इत्यादींमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. सध्या अनेक युवक युवती केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. तेव्हा असे योगासन सांगणार आहोत जे नियमित केल्याने केस गळायची कमी होऊन, डोक्यावर नवीन केस सुद्धा उगवतील.
advertisement
1/6

बालायम हा एक योग प्रकार असून केसांशी संबंधित समस्यांवर उपयोगी ठरतो. दररोज सकाळी 5 ते 10 मिनिटं जरी हा योग केला तरी तुम्हाला फायदा मिळू शकतो. यामुळे केवळ केस गळतीचं थांबत नाही तर डँड्रफ, ड्राय स्कॅल्प, केसांचा पातळपणा इत्यादींसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
advertisement
2/6
बालायम हा योग प्रकार तुम्ही कधीही कोठेही उभं राहून करू शकता. यासाठी प्रथम आल्या दोन्ही हातांना छातीच्या जवळ घ्या त्यानंतर दोन्ही हाताच्या नखांना एकमेकांवर रगडा. हे करत असताना अंगठ्याच्या नखाला रगडायचे नाही याची काळजी घ्या.
advertisement
3/6
दररोज बालायम योग प्रकार केल्यावर तुम्हाला लगेच फरक जाणवणार नाही. यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. बालायम केल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल.
advertisement
4/6
बालायम करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे हा व्यायाम केवळ 5 येत 10 मिनिटांसाठीच करा. तसेच जेवण झाल्यावर 1 ते 2 तासांचा गॅप ठेवा.
advertisement
5/6
बालायम करण्यासोबतच तुम्ही अजून थोडा वेळ काढून शीर्षासन, अधोमुख श्वानासन हे व्यायाम प्रकार सुद्धा करू शकता.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Yoga Benefits : तरुणपणीच डोक्यावर टक्कल पडतंय? रोज फक्त 5 मिनिटं करा 'हा' योग, केस गळणं थांबेल