संभाजीनगरची लेक 'वंदे भारत' चालवणार, कोण आहे कल्पना धनावत?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरची लेक भारतातील सर्वात वेगवान ट्रेनची लोको पायलेट म्हणून काम करणार आहे.
advertisement
1/7

भारत सरकारने देशात वंदे भारत ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. 30 डिसेंबर रोजी जालना ते मुंबई नवीन वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे.
advertisement
2/7
छत्रपती संभाजीनगरची लेक आता वंदे भारत ट्रेन चालवणार आहे. फुलंब्री तालुक्यातील पालच्या कल्पना धनावत हिची सहाय्याक लोको पायलट म्हणून निवड झालीय.
advertisement
3/7
कल्पनाचे वडील मदनसिंग धनावत हे एस. टी. महामंडळामध्ये नोकरीत होते. तर मुलगी रेल्वेमध्ये लोको पायलट झालीय.
advertisement
4/7
कल्पनाने संभाजीनगर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. 2019 साली कल्पनाची परीक्षेद्वारे रेल्वेमध्ये लोको पायलटसाठी निवड झाली.
advertisement
5/7
सध्या कल्पना लोको पायलट म्हणून काम करत आहे. मात्र आता ती वंदे भारत ट्रेनसाठी सहाय्यक लोको पायलट म्हणून कार्यरत असणार आहे.
advertisement
6/7
छत्रपती संभाजीनगरची लेक भारतातील सर्वात वेगवान ट्रेनची लोको पायलेट म्हणून काम करणार असल्याने ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
advertisement
7/7
कल्पना वंदे भारतची सहाय्यक लोको पायलेट झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरची लेक 'वंदे भारत' चालवणार, कोण आहे कल्पना धनावत?